(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टीव्ही जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. रश्मी देसाईचा एक्स पती नंदीश संधूचा साखरपुडा झाला आहे. तो “उत्तरन” या लोकप्रिय मालिकेसाठी ओळखला जातो. त्याच शोमध्ये तो रश्मी देसाईला भेटला आणि नंतर दोघांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले. परंतु, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोन वर्षांतच ते तुटले. आता, नंदीश पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.
‘कंतारा चॅप्टर १’ चा बॉक्स ऑफिसवर सुरु आहे धबधबा, चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
नंदीश संधूने इन्स्टाग्राम त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने फोटोला कॅप्शन देखील दिले आहे, “हाय, पार्टनर.” त्याच्या भावी पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आकांक्षा पुरीपासून ते अविनाश सचदेव, आरती सिंग आणि टीना दत्तापर्यंत, टीव्ही सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे आणि आयुष्यातील नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. असे सांगितले जात आहे की नंदीश आणि कविता या वर्षी सप्टेंबर महिन्यात साखरपुडा झाला होता आणि हे फोटो आता शेअर केले आहेत.
‘उत्तरन’ चित्रपटातून नंदीश संधू आणि रश्मी देसाईचे प्रेम फुलले
नंदीशसाठी हा क्षण खूप खास आहे. त्याला अखेर प्रेम करण्यासाठी कोणीतरी सापडले, पण त्यासाठी त्याला नऊ वर्षे वाट पहावी लागली. नंदीशबद्दल बोलायचे झाले तर, तो टीव्ही आणि चित्रपट दोन्हीमधील त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने २००६ मध्ये ‘स्स्स्स्स्स्स… फिर कोई है’ या मालिकेतून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘हम लडकियां’ आणि ‘उत्तरन’ सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले. २००८ मध्ये ‘उत्तरन’ मालिकेतून त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली. ‘उत्तरन’ मालिकेच्या सेटवरच त्याची रश्मी देसाईशी भेट झाली आणि त्यांचे प्रेम फुलले.
पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन
रश्मी देसाई आणि नंदीश यांचे नाते दोन वर्षाच टिकले
रश्मी देसाई आणि नंदीश यांचे नाते लवकरच संपुष्टात आले. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले, परंतु अवघ्या दोन वर्षांनी, २०१४ मध्ये, त्यांच्यातील दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. परंतु, त्यांचे नाते एका महत्त्वाच्या टप्प्यावर संपले. घटस्फोटानंतर, रश्मी देसाईने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले आणि तिच्या एक्स पतीवर अनेक गंभीर आरोप केले. अभिनेत्रीच्या आरोपांमुळे संतप्त होऊन, नंदीशने सर्व संबंध तोडले. स्वतः अभिनेत्याने एकदा म्हटले होते की तो तिच्याशी मैत्री करणे देखील योग्य मानत नाही.