Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आभाळ रातीला’ गाण्याने सजना चित्रपटाची वाढवली रंगत; रसिकांच्या मनाला दिला नवा स्पर्श

'सजना' चित्रपटातील "आभाळ रातीला" हे गाणं प्रेम, परंपरा आणि मराठी संस्कृतीचं सुंदर मिश्रण सादर करत रसिकांच्या मनाला भावतंय. या गाण्यातील पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आणि भक्तिरसामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 06:14 PM
‘आभाळ रातीला’ गाण्याने सजना चित्रपटाची वाढवली रंगत; रसिकांच्या मनाला दिला नवा स्पर्श
Follow Us
Close
Follow Us:

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं अलीकडेच रसिकांच्या भेटीला आलं असून, त्याने प्रेक्षकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला आहे. प्रेम, नाते-संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणाऱ्या या चित्रपटात, हे गाणं प्रेमभावनेचा नाजूक आणि गोड अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवतं. प्रेम ही भावना शब्दांइतकीच सूरांतूनही व्यक्त करता येते, हे या गाण्यातून नेमकं दाखवण्यात आलं आहे.

मोहन आगाशे बायकोच्या खूनाचा कट कसा रचणार ? ‘आतली बातमी फुटली’चा रंजक टीझर रिलीज

“आभाळ रातीला” हे गाणं केवळ एक रोमँटिक गीत नसून, ते मराठी संस्कृतीचा ठेवा आणि पारंपरिक मूल्यांचा गौरव करणारा एक अभिव्यक्तीमधला सोहळा आहे. ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर पारंपरिक मराठी पोशाखात नाचणारी तरुणाई, मुख्य कलाकारांचं सादरीकरण आणि देवीची मंगल स्तुती, या सगळ्याचा संगम प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतो.

गाण्याचं चित्रीकरण भव्य आणि देखणं आहे. मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक, सजीव लेझीम नृत्य यांचा समावेश करून हे गाणं एक सणासारखा अनुभव देतं. हे गाणं मनोरंजन तर आहेच, पण त्याहूनही अधिक ते मराठी संस्कृतीप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम यांचं दर्शन घडवतं. प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते आणि म्हणूनच हे गाणं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

आदर्श शिंदेच्या कणखर आवाजातलं ‘कर वार’ गाणं रिलीज, ‘देवमाणूस’मधील दशावतारावरआधारित भक्तीगीत प्रदर्शित

गाण्याला सुहास मुंडे यांनी शब्दबद्ध केलं आहे, तर संगीतकार ओंकारस्वरूप यांच्या संगीताने त्याला जिवंत केलं आहे. गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार यांच्या दमदार आवाजाने गाण्याला वेगळंच उंचीवर नेलं आहे. सजना चित्रपट २३ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा असून, त्यांनी चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सर्व स्वतः केलं आहे. “आभाळ रातीला” या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अगदी शिघेला पोहचली आहे.

Web Title: New marathi song aabhaal ratila got released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • marathi cinema
  • viral Song

संबंधित बातम्या

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत
1

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत

‘मी सध्या खूप काही…’, Tateeree वादावर बादशाहने सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया देत व्यक्त केल्या मनातील भावना
2

‘मी सध्या खूप काही…’, Tateeree वादावर बादशाहने सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया देत व्यक्त केल्या मनातील भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.