पारू मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! श्रीकांत घरच्यांसमोर उघड करणार का आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य?
झी मराठीवरील पारू मालिकेचे प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण अखेर आलाच. पारू आणि आदित्यचा विवाहसोहळा पार पडला. हा विवाहसोहळा धुमधडाक्यात आणि कोणताही गाजावाज न करता आणि किर्लोस्कर कुटूंबियांच्या अनुपस्थितीत पार पडला. खरं पारू आणि आदित्यच्या या विवाह सोहळ्याला मारूती, प्रीतम आणि गुरुजी केवळ इतक्या लोकांनीच उपस्थिती लावली होती.
खरं तर, एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान पारू आणि आदित्यचं खोटं लग्न होतं. मात्र खेडेगावातील मुलगी पारू त्या खोट्या-आभासी लग्नाला खरं मानते. जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान आदित्य पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र घालतो, ते मंगळसूत्र ती कायम जपून ठेवते. ही गोष्ट कोणालाच माहिती नसते. त्यामुळे खरं तर पारू अनेक महिन्यांपासून तिच्या गळ्यात आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालतेय. जेव्हा हे सत्य दिशाला कळतं, तेव्हा ती हे सत्य आदित्यला सांगते आणि त्याला पारूविरोधात भडकवते. एवढचं नाही तर दिशा मारूती म्हणजेच पारूच्या वडिलांचे देखील या मंगळसूत्राबाबत कान भरते.
ALTT Balaji वर बंदी घातल्यानंतर एकता कपूर संतापली! जारी केले निवेदन
यावेळी दिशा पारूच्या वडिलांना सांगते की, पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र नष्ट करायचं, नाहीतर ती संपूर्ण किर्लोस्कर कुटूंबियांना या मंगळसूत्राविषयी सांगणार. दिशाच्या सागंण्याप्रमाणे, पारू झोपलेली असताना मारूती तिच्या गळ्यातील मंगळसूत्राचा काळा धागा कापून टाकतो. याशिवाय ते मंगळसूत्र नष्ट करण्यासाठी त्याला जाळण्याचा देखील प्रयत्न करतो. हे सर्व सुरु असतानाच आदित्यवर पुन्हा एक नवं संकट आणि त्याच्या पायाला दुखापत होते. त्यामुळे आदित्यचं रक्षण करणारी मुलगी दुसरी-तिसरी कोणीही नसून पारूच आहे, हे मारूतीला कळतं. (फोटो सौजन्य – instagram)
यानंतर पारू आणि मारूती जेव्हा गुरूजींकडे जाऊन, त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतात, तेव्हा गुरुजी त्यांना उपाय सांगतात की, देवीच्या उत्सवादरम्यान सूर्यास्तापूर्वी पारू आणि आदित्यचं लग्न होणं गरजेचं आहे, तरचं आदित्यच्या जीवावरील धोका टळेल. देवीच्या उत्सवादरम्यान अनेक संकटांना तोंड देऊन सूर्यास्तापूर्वी मारूती, प्रीतम आणि गुरुजींच्या उपस्थितीत पारू आणि आदित्यचा विवाहसोहळा पार पडतो आणि आदित्या पुन्हा एकदा पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो.
पारू आणि आदित्यचा विवाहसोहळा सुरु असताना श्रीकांत किर्लोस्कर ( आदित्यचे वडील ) तेथे येतात आणि हा सर्व प्रकार पाहून त्याला धक्का बसतो. यानंतर श्रीकांत बेशुद्ध होतो. त्यानंतर किर्लोस्कर कुटूंबिय त्याला घरी घेऊन येते. जेव्हा दुसऱ्या दिवशी श्रीकांत जेव्हा शुध्दीवर येतो, तेव्हा त्याला काल घडलेला संपूर्ण प्रकार आठवतो आणि तो आदित्यसोबत बोलणं टाळतो. यावेळी श्रीकांत असं सांगतो की त्याला आहिल्यादेवी ( आदित्यचे आई) सोबत काही बोलायचं आहे, त्यामुळे तो तेथे उपस्थित असलेल्या कुटूंबातील सर्व सदस्यांनी खोलीबाहेर जाण्यास सांगतो.
Bigg Boss 19: बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू, सलमान खानच्या शो चा पहिला लुक समोर, बदलला Logo
यानंतर जेव्हा आदित्या श्रीकांतसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी श्रीकांत आदित्यसोबत बोलणं टाळतो. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की, श्रीकांत पारूला आदित्य आणि तिच्या लग्नाबद्दल जाब विचारतो, त्याचवेळी आहिल्या तेथे पोहोचते. आता अशी उत्सुकता लागली आहे की, श्रीकांत संपूर्ण किर्लोस्कर कुटूंबियांना आदित्य आणि पारूच्या लग्नाबद्दल सांगणार का? याशिवाय आहिल्यादेवी पारूला सून म्हणून स्विकारणार का? मालिकेत नेमकं काय घडणार? श्रीकांत आहिल्याला आदित्य आणि पारूच्या लग्नाबद्दल सांगणार का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मिळतील.