Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निळू फुलेंच्या लेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, गार्गी फुले नक्की आहेत तरी कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं.

  • By साधना
Updated On: May 30, 2023 | 01:28 PM
gargi phule enters rashtrawadi congress

gargi phule enters rashtrawadi congress

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. आता अभिनेते निळू फुले यांची लेक, अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Nilu Phule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtrawadi Congress) या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गार्गी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (Gargi Phule Enters NCP) केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या,“गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत. त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देईल”.

त्या पुढे म्हणाल्या,“राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत वडिलांचे खूप चांगले संबंध आहेत. आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रवाहात येईन. आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे. तरुणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल व्हावा तसाच माझा सुद्धा प्रयत्न असेल. भविष्यात पक्षाने तिकीट दिलं तर लढेन”.

स्त्रीमुक्ती विषयात पदवी
गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवी घेतली आहे. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांचे वडिल निळू फुले यांच्याकडून मिळालं. पुढे मग 1998 साली प्रायोगिक नाटकाच्या माध्यमातून त्या मनोरंजनसृष्टीशी जोडल्या गेल्या. सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. समन्वय या नाट्यसंस्थेच्या प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी काम केलं आहे.

मालिका, सिनेमा आणि वेबसीरीजमध्येही गार्गी फुलेंचं काम
गार्गी फुले यांनी मराठी मालिका, सिनेमे, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. ‘मळभ’, ‘कोवळी उन्हे’, ‘श्रीमंत’, ‘वासंती जीर्णनी’, ‘सुदामा के चावल’, ‘सोनाटा’ इत्यादी नाटकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केलं आहे. तर ‘राजा राणी ची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तुला पाहते रे’, ‘कट्टी बट्टी’ या मालिकांमध्ये गार्गी फुले यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच ‘चिकटगुंडे’सारख्या वेबसीरिजमध्येही त्या झळकल्या आहेत. आता राजकारणात त्यांचं काम कसं असेल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे.

Web Title: Nilu phule daughter gargi phule entered in rashtra wadi congress party nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2023 | 01:19 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.