लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर अवॉर्ड्स सोहळ्याचे 2024 (Oscar 2024) आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी ऑस्कर सोहळ्यात काहीतरी नवीन आणि धक्कादायक पाहायला आणि ऐकायला मिळतं. कधी थप्पड तर कधी सेल्फी, अशा अनेक घटना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लोकांचे लक्ष वेधून घेतात. यावेळी काहीतरी आश्चर्यकारक घडले ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे अवॉर्ड शोशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो कुस्तीपटू आणि हॉलीवूड अभिनेता जॉन सीनाचा आहे. या व्हिडीओमध्ये जॉन ऑस्करच्या मंचावर नग्न अवस्थेत अवॉर्ड सादर करण्यासाठी आला होता. ऑस्कर सोहळ्यात जॉन सीनाचा हा अवतार पाहून सर्वांनाच धक्का बसला.
[read_also content=”96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला धमाकेदार सुरुवात, ओपेनहाइमरने पटकावले तब्बल 7 ऑस्कर; पाहा विजेत्यांची यादी! https://www.navarashtra.com/latest-news/oppenheimer-won-seven-academy-awards-2024-see-full-winner-list-nrps-514433.html”]
कुस्तीपटू आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाने ऑस्कर 2024 मध्ये केलेल्या एंट्रीसाठी जगभरात त्याची चर्चा होत आहे. जॉन सीना ऑस्कर 2024 मध्ये कॉस्च्युम डिझाइनसाठी पुरस्कार सादर करण्यासाठी पोहोचला होता. जॉन स्टेजवर येण्यापूर्वी, होस्ट जिमी किमेलने एक जुनी घटना आठवली जेव्हा पुरस्कार सादरीकरणादरम्यान एक नग्न माणूस स्टेजवर धावू लागला. आज अशी व्यक्ती येईल का, असा प्रश्न जिमीने उपस्थितांना विचारला. पुरस्कार देण्यासाठी कोणीतरी नग्न अवस्थेत येत असल्याचे तो सर्वांना आधीच सांगतो. यानंतर तो जॉन सीनाला कॉल करतो. जॉन स्टेजवर येताच त्याला पाहून सगळेच हैराण झाले. एवढेच नाही तर जॉनला असे पाहून सगळे जोरजोरात हसायला लागतात. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
MARGOT ROBBIE REACTING TO A NAKED JOHN CENA LMAOOOOOO #Oscars pic.twitter.com/BXTN5EiaQ0
— ໊ (@addictionmargot) March 11, 2024
रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ऑस्कर 2024 मध्ये ओपेनहायमर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, द व्हाइन जॉय रँडॉल्फला द होल्डओव्हर्स चित्रपटासाठी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे द बॉय अँड हेरॉनला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म, ओपनहाइमरला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, पुअर थिंगला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन, ओपेनहाइमरला सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासाठी पुरस्कार मिळाला.