भारतात कधी अन् कुठे पाहता येणार 'Oscars 2025' सोहळा? जाणून घ्या एका क्लिकवर
Oscars 2025 Live Streaming : ९७ व्या अकादमी पुरस्कारांची म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ (Oscars 2025) बद्दल जगभरात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची जगभरातील प्रत्येक कलाकार आतुरतेने वाट पाहत असतो. भारतातील सिनेप्रेमी सुद्धा हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. दरवर्षीप्रमाणे, यावर्षी सुद्धा ९७ वा अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. भारतात ऑस्कर 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग (Oscars 2025 Live Streaming) कसे आणि केव्हा करता येईल ते जाणून घेऊयात…
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) द्वारे दरवर्षी सादर केला जाणाऱ्या 2025 च्या ऑस्कर नामांकनांची अधिकृत घोषणा 23 जानेवारी रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला १७ जानेवारी रोजी नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु ते १९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आणि नंतर लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे पुन्हा 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. आता या कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा भारतातील प्रेक्षकांना ओटीटीवर आणि काही टीव्ही चॅनलवरही लाईव्ह पाहता येणार आहे.
The countdown for Hollywood’s most iconic event is ON!🤩 Watch the Oscars LIVE on Star Movies, Star Movies Select & @JioHotstar on 3rd March at 5:30 AM. Catch the repeat at 8:30 PM on Star Movies and Star Movies Select.#Oscars #StarMovies pic.twitter.com/0SJvaoUwnw — StarMoviesIndia (@StarMoviesIndia) February 27, 2025
भारतीय वेळेनुसार ३ मार्च २०२५ रोजी सोमवारी सकाळी पहाटे ५:३० वाजता ‘जिओ स्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘ऑस्कर २०२५’ हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय भारतीय प्रेक्षकांना ‘स्टार मूव्हीज’ किंवा ‘स्टार मूव्हीज सिलेक्ट’ या टिव्ही वाहिन्यांवरही ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. या सोहळ्याचा रिपीट टेलिकास्ट सुद्धा रात्री ८:३० वाजता याच दोन्ही वाहिन्यांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे जर प्रेक्षकांना पहाटे पुरस्कार सोहळा पाहायला नाही मिळाला तर ३ मार्चला रात्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
Namdeo Dhasal Movie: “सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी”, मल्लिका शेख यांची मागणी
लेखक, निर्माता आणि प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखला जाणारा कॉनन ओ’ब्रायन यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. कॉनन ओ’ब्रायन पहिल्यांदाच ऑस्कर होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारत असून यापूर्वी त्याने २००२ आणि २००६ मध्ये एमी पुरस्काराचे होस्टिंग केले होते.