
प्रसाद जवादेच्या आईचे कर्करोगाने निधन (फोटो सौजन्य - Instagram)
‘पारू’ मालिकेतून घेणार ‘ही’ अभिनेत्री एक्झिट, फोटो शेअर करत म्हणाली ‘शेवटचे एकदा…’
अमृताने शेअर केली स्टोरी
अमृताने नेहमीच आपल्या सासूबाईंबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले आहे आणि यावेळीदेखील तिने पोस्ट शेअर करत आपल्या सासूबाईंच्या जाण्याबाबत दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, ‘सौ प्रज्ञा जवादे ( प्रसाद जवादेची आई) 15 सप्टेंबर 1960 – 28 डिसेंबर 2025, वय 65 वर्षे… कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आज, 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य, आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील.’ असे लिहित या पोस्टच्या खाली तिने आम्हाला तुमची खूप आठवण येईल मम्मी!’ असे कॅप्शनदेखील इंग्रजीमध्ये लिहिले आहे.
झी पुरस्कार सोहळ्यात लावली होती हजेरी
‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत
यंदाच्या झी पुरस्कार सोहळ्यात प्रसादला पुरस्कार मिळत असताना इतक्या आजारातही त्याच्या आईने हजेरी लावली होती आणि संपूर्ण वातावरण अगदी भावूक झालं होतं. यावेळीच अमृताने प्रसादच्या आईच्या तब्बेतीबाबत सर्वांना सांगितलं होतं आणि प्रसाद आपल्या आईची किती आणि कशा पद्धतीने तारेवरची कसरत करून काळजी घेतो आणि हा पुरस्कार त्याला मिळणं किती महत्त्वाचं होतं हेदेखील सांगितलं होतं. प्रसादच्या आईला मागच्या वर्षी दिवाळीत कॅन्सर असल्याचं निदान झाल्याचंही तिने यावेळी स्पष्ट केलं होतं. प्रसादला या सोहळ्यात उत्कृष्ट मुलगा म्हणून पुरस्कार मिळाला होता आणि तो किती परफेक्ट आहे हेच यावेळी अमृताने सांगितलं होतं.
प्रसादच्या आईचं स्वप्नं
पारू स्वीकारताना प्रसादने फक्त आईचं स्वप्नं पूर्ण केलं होतं. त्याच्या आईला रोज प्रसादला मालिकेत पहायचं होतं आणि त्याने तिचे ते स्वप्नं पूर्ण केलं. पारू करतानाच आईची ट्रिटमेंट चालू होती. एकीकडे बालिश वाटणारा प्रसाद, आधी बोलतो आणि मग विचार करतो असा प्रसाद असं तो वागतो आणि मग त्यालाच त्रास होतो. पण या काळात त्याच्या आईचा तो बाबा झाला होता आणि त्याची वेगळी बाजू पहायला मिळाली असंही अमृताने आवर्जून यावेळी सांगत सर्वाचं मन जिंकून घेतलं होतं आणि यावेळी सर्वच कलाकार भावूक झाले असल्याचं दिसून आलं होतं.
माझा श्रावण बाळ
प्रसादच्या आईने अभिमानाने यावेळी सांगितलं की, ‘हॉस्पिटलमध्ये सर्वांनी त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं आहे आणि तो खरंच श्रावण बाळासारखाच आहे. माझा आधुनिक श्रावण बाळ.’ प्रसाद जवादेसाठी त्याची आई ही सर्वस्व होती त्यामुळे वर्षाअखेरीस त्याच्याावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान प्रसादने याबाबत कोणतीही पोस्ट केलेली नाही. मात्र अमृता त्याला या काळात नक्कीच साथ देईल