झी मराठीवरील अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळतात. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'पारू' होय... 'पारू' ही मालिका सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शरयु सोनावणे हिने सोशल मीडियावर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
Sharayu Sonawane Saree
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ची भूमिका साकारत आहे. मालिकेतल्या मुख्य अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये शरयूने नुकतीच पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने मोरपंखी रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने खूप सुंदर लूक केलेला आहे.
शरयूचा हा सिंपल अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे चाहते झाले आहेत. मोकळे केस, हलका मेकअप आणि सिंपल अंदाज अशा अंदाजात अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
मोरपंखी पैठणीवर अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.