Paaru Serial Actor Shantanu Gangane Talk About His Salary Issue
झी मराठीवरील ‘पारू’ मालिका कमालीची चर्चेत आहे. या मालिकेतील कलाकारांना महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेमध्ये मोहन किर्लोस्करची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शंतनू गगणेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत फोटोज् आणि व्हिडिओजमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नसल्याबद्दल वक्तव्य केले होते. आता एका मुलाखतीत त्याने यावर भाष्य केले आहे.
प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू, अनेक दिवसांनंतर झाला उलगडा; मृत्यूचं कारण गुलदस्त्यात
अलिकडेच, अभिनेता शंतनू गंगणे याने ‘सेलिब्रिटी कट्टा’ला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओचा आणि ‘पारू’ मालिकेचा काहीही एक संबंध नाही, असंही सांगितले. दरम्यान, अभिनेत्याला मुलाखतीमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओचा आणि ‘पारू’ मालिकेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारला. यावर शंतनू म्हणाला की, “सर्वांचा गैरसमज झाला होता की, मी फक्त ‘पारू’ मालिकेबद्दल बोलतोय. पण तसं काहीही नाही. मी त्या मालिकेमध्ये काम करत असतानाच मला वेळोवेळी पैसे मिळालेले आहेत. थोडं उशिरा का होईना, पण आम्हाला पैसे मिळालेले आहेत.”
“आपल्या डोक्यात हवा गेली होती…” राशीचक्रकार शरद उपाध्येंनी निलेश साबळेंना चांगलंच सुनावलं…
मुलाखतीमध्ये पुढे अभिनेता म्हणाला की, “मी अभिनेता म्हणून ‘पारु’ मालिकेमध्ये दिसतो. त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की, मी त्याच मालिकेबद्दल बोलतोय, पण तसं काहीही नाही. इंडस्ट्रीमध्ये असेही काही निर्माते आहेत, जे वर्षानुवर्ष उत्तम पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे काम करतात. सांगितल्याप्रमाणे कलाकारांना तारखा देणं, वेळेवर मानधन देणं हे ते करतात. खूप निर्माते आहेत असे आहेत, जे स्वतः कलाकारांना फोन करून सांगतात की, तुझं पेमेंट तयार आहे. एक-दोन दिवस उशीर होणार असेल, तर तसंही सांगितलं जातं. असे चांगले निर्मातेदेखील आहेत. आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कोणाचंही नाव घेणार नाही. कारण – लोकांना असं वाटेल की, अमुक एखाद्या व्यक्तीची बाजू घेत आहे.”