अभिनेत्री पूजा (Pooja Sawant) सांवत सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेयर करत असते. मात्र, अनेकदा चाहते तिला विचारताना दिसताता की लग्न कधी करणार आहे तीच्या आयुष्याचा जोडीदार कोण आहे. आता या सगळ्या प्रश्नांना पूजाने उत्तर दिलं आहे. पूजाने तिच्या सोशल मीडिया अंकाऊटवर तिचे एका तरुणासोबतचे फोटो शेयर केले आहेत. मात्र, हा कोण आहे हे काही तिने मात्र सांगितलेलं नाही.
[read_also content=”दिग्दर्शकानं सिनेमाचं नाव ‘अॅनिमल’ का ठेवलं, ‘हे’ आहे कारण; रणबीर कपूरने केला खुलासा! https://www.navarashtra.com/movies/ranbir-kapoor-reveal-why-sandip-wanga-reddy-choose-animal-name-for-his-movie-nrps-484246.html”]
पुजाने नुकतंच इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळील फोटो आहे. “ज्यामध्ये पाठमोरं शरीर असलेला एक तरुण दिसत आहे. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. या फोटोला तिने छानसं कॅप्शन दिलं आहे. “We Are Engaged”, “आयुष्याचा एका नव्या अध्यायाची एका नव्या व्यक्तीसोबत सुरुवात”.
पूजा सावंतने फोटो पोस्ट करताच फॅन्ससह सेलिब्रिटींनीही कमेंटचा वर्षाव केला आहे. सायली संजीव, भूषण प्रधान, तेजस्विनी पंडीतसह अनेक कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.