मुंबई : शुक्रवारी सकाळपासून इंटरनेटवर एकाच विषयावर चर्चा होती ती म्हणजे मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची (Poonam Panday Death News). गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ( Cervical Cancer) पूनम पांडेचं निधन झाल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलं होत. तेव्हापासून सेलेब्रिटिंसह फॅन्सनाही तिच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला होता. मात्र, तिच्या मृत्यूबदद्ल संशयही व्यक्त करण्यात येत होता. अनेकांना हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं वाटत होतं. अखेर त्यांचा हा संशय खरा ठरला आहे. स्वत:च्या मृत्यूच्या बनाव रचणारी पूनम पांडे जिवंत आहे (Poonam Pandey Alive) आणि पूर्णपणे बरी आहे. शनिवारी सकाळी तिनं एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तीने तिच्या मृत्यूमागील सत्य सांगताना दिसत आहे.
[read_also content=”श्रेयस तळपदेचं रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक; महेश मांजरेकरांच्या चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत! https://www.navarashtra.com/movies/shreyas-talpade-will-be-seen-in-mahesh-manjrekar-film-in-the-lead-role-nrps-504113.html”]
पूनमने तिच्या इन्स्टाग्राम अंकाऊटवरु एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पूनम म्हणतेय- ‘मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरण पावले नाही. दुर्दैवाने, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ज्या शेकडो आणि हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी हे सांगू शकत नाही. हे त्याबद्दल काही करू शकले नाही म्हणून नाही तर त्याबद्दल काय करावे हे त्यांना माहीत नव्हते म्हणून.
मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की, इतर कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येण्याजोगा आहे. “तुम्हाला फक्त स्वतःची तपासणी करायची आहे आणि तुम्हाला HPV लस घ्यावी लागेल.”