'देवमाणूस' परत येतोय! टीझर प्रदर्शित; किरण गायकवाड कमबॅक करणार?
सध्या प्रेक्षकांकडून झी मराठीवरील अनेक मालिकांना दमदार प्रतिसाद मिळत आहे. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’सह अनेक मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता अशातच आणखी एक मालिका या यादीमध्ये सामील होणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेने मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता किरण गायकवाडला महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रियता मिळाली. ही मालिका झी मराठी चॅनलवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे आजवर दोन सीझन रिलीज झाले आहेत. या दोन्हीही सीझनना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत मालिकांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. टेलिव्हिजन मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेचा आता लवकरच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण… ”
‘देवमाणूस’ मालिकेमध्ये अभिनेता किरण गायकवाडने अजितकुमार देव नावाच्या बोगस डॉक्टरची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या कम्पाऊंडरच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होती. याशिवाय मालिकेमधील सरू आजी, मंगल ताई, टोन्या, डिंपल, बज्या, नाम्या, रेश्मा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग या इतर पात्रांनी प्रेक्षकांचं भरभरुम प्रेम मिळालं आहे. आता हे सर्व पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला मालिकेतून येणार आहे. लवकरच ‘देवमाणूस’ मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच निर्मात्यांकडून मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. झी मराठी वाहिनीने ‘देवमाणूस’ मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस – लवकरच.. आपल्या झी मराठीवर!” असं कॅप्शन देत वाहिनीकडून मालिकेच्या आगामी भागाबद्दल संकेत दिल्याचे पाहायला मिळत आहेत.
पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा किरण गायकवाड कमबॅक करणार का? याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. वाहिनीने शेअर केलेला प्रोमोवर तशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत. तर, अभिनेत्री पूर्वा शिंदेने थेट किरण गायकवाडचं नाव घेत कमेंट केली आहे. यावरून किरण कमबॅक करणार असल्याची हिंट प्रेक्षकांना मिळाली आहे. दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेचा मधला अध्याय केव्हापासून सुरू होणार ? आणि मुख्य भूमिकेत कोण झळकणार ? याची घोषणा ‘झी मराठी’कडून केव्हा करण्यात येणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आतापर्यंत या मालिकेचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांना मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेचे ‘मधला अध्याय’ मध्ये नेमकं कथानक काय असणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ला नंबर १ होण्यासाठी ‘या’ दोन चित्रपटांचं चॅलेंज, धुलिवंदनाला केली सर्वाधिक कमाई
३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ ची घोषणार केली. १० सप्टेंबर २०२२ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या दोन वर्षांत ‘देवमाणूस’ मालिकेची क्रेझ घराघरांत निर्माण झाली. त्यामुळे आता ‘झी मराठी’ने पुन्हा एकदा ‘देवमाणूस’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केलेली आहे.