सध्या सगळीकडे निवडणूकांचे वारे वाहताना दिसत आहेत. कोरोनाचे निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सगळ्यात पक्षात निवडणूकांची तयारी होताना दिसत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांचीही सुरूवात झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi joins NCP) यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात (ncp office mumbai) आसावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे मुख्यालयात छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे, मागील वर्षी आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता होता. पण, वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
आसावरी जोशी यांच्याविषयी थोडक्यात
आसावरी जोशी यांचा जन्म ६ मे १९६५ साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपाणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांचं काम पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९८६ ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या. परंतु त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. यांच्या ‘ऑफिस ऑफिस’ या मालिकेमुळं. २००२-०४ या दरम्यान सुरु असलेल्या त्या विनोदी मालिकेत त्यांनी उशा ही व्यक्तिरेखा साकारली होती. अन् ही व्यक्तिरेखा त्याकाळी तुफान गाजली.