
सिंगर केके (कृष्णकुमार कुन्नथ) (KK)यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये (postmortem report)त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॉन्सर्टमध्ये केके जास्त एक्साईटेड झाले होते, त्यामुळे त्यांचे ह्रद्य ८० टक्के ब्लॉक झाले होते, याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना लगेच सीपीआर दिले तर कदाचित त्यांचा प्राण वाचला असता असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
केके यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या कॉन्सर्टमध्ये केके जास्त एक्साईटेड झाले होते, त्यामुळे त्यांचे ह्रद्य ८० टक्के ब्लॉक झाले होते, याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना लगेच सीपीआर दिले तर कदाचित त्यांचा प्राण वाचला असता असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ह्रद्याच्या डाव्या बाजूला ८० टक्के ब्लॉकेजेस होते. तर इतर ह्रद्यात छोटे छोटे ब्लॉक्स होते. लाईव्ह शोमध्ये केके स्टेजवर फिरत होते आणि गर्दीसोबत डान्स करीत होते. त्यामुळे ते जास्त एक्साईटेड झाले. त्यामुळे त्यांच्या ह्रद्याचा रक्तपुरवठाच थांबला. हेच कार्डिएक अटॅक येण्याचे कारण होते. कार्डिएक अरेस्टमध्ये ह्रद्यात क्षणार्धात काम करण्याचे बंद करते. ह्रद्याचा रक्तपुरवठा थांबल्याने त्यांच्या ह्रद्याचे ठोके अनियमित झाले होते. थोड्याच वळात ते बेशुद्ध पडले आणि त्यांना कार्डिएल अरेस्ट अटॅक आला. त्याचवेळी त्यांना सीपीआर दिले असते तर त्यांचा प्राण वाचू शकला असता.