Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhay Verma Shares Memorable Experience: शाहरुख यांच्या हजरजबाबीपणावर अभय वर्मा फिदा; ‘किंग’च्या सेटवरील आठवणींना दिला उजाळा

Abhay Verma Shares Memorable Experience: अभिनेता अभय वर्माने शाहरुख खान यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत ‘किंग’ चित्रपटाच्या सेटवरील अविस्मरणीय अनुभव सांगितला. २९ सप्टेंबर रोजी शाहरुख यांच्यासोबत पहिल्यांदा दृश्याचे चित्रीकरण करतानाचा आनंद त्याने आपल्या डायरीत नोंदवला होता.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 06:09 PM
Abhay Verma Shares Memorable Experience: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Abhay Verma Shares Memorable Experience: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभय वर्माने शाहरुख खानसोबतचा खास अनुभव केला शेअर.
  • ‘किंग’च्या सेटवरील पहिल्या शूटिंगचा सांगितला किस्सा.
  • शाहरुख यांच्या हजरजबाबीपणाचे आणि व्यावसायिकतेचे केले कौतुक.

अभय वर्माच्या आगामी बहुप्रतीक्षित ‘किंग’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट असून, या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्यासोबत काम करत आहे. शाहरुख खान यांच्या वाढदिवसानिमित्त अभयने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने ‘आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस’ कसा होता, याचा अनुभव सांगितला आहे. Abhay Verma Shares Memorable Experience:

अभयने आपल्या डायरीमध्ये २९ सप्टेंबर हा दिवस खास नोंदवला आहे. या हस्तलिखित नोंदीमध्ये त्याने शाहरुख खान यांच्यासोबत पहिल्यांदा दृश्याचे चित्रीकरण करतानाचा अनुभव सांगितला आहे.

त्याने लिहिले, “आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. यापूर्वी कधी इतका आनंद झाला असेल, असं वाटत नाही.
आज मी शाह सरांसोबत एक दृश्य चित्रित केलं. तिथे दुसरं कोणीही नव्हतं, फक्त सर आणि मी होतो. सेटवर जाण्यापूर्वी सिद्धांतने मला याबद्दल सांगितलं होतं, पण माझा विश्वासच बसत नव्हता. सेटवर पोहोचल्यानंतर हे खरं असल्याचं समजलं आणि मी अचानक खूप घाबरलो. तेवढ्यात सर आले आणि त्यांनी माझ्या गालावर किस करून माझी भेट घेतली.”

हसत त्याला परवानगी

अभयने पुढे सांगितले की, तालमीदरम्यान त्याने शाहरुख यांना विचारले की, तो त्यांच्या हातावर स्वतःच्या शरीराचे वजन देऊ शकतो का? त्यावर शाहरुख यांनी हसत त्याला परवानगी दिली. मात्र, अभयने प्रत्यक्षात तसे केले तेव्हा शाहरुख म्हणाले, ‘आत्ता नाही बेटा, प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी.’ त्यानंतर दोघेही जवळपास १५ सेकंद हसत राहिले.

यानंतर सिद्धांत आनंद यांनी तिथे येऊन काय झाले, अशी विचारणा केली. शाहरुख यांनी त्यांना संपूर्ण प्रसंग सांगितला आणि तेही हसू लागले. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली.

कोणालाही त्याची जाणीव होऊ दिली नाही

अभयने लिहिले, “चित्रीकरण सुरू असताना माझ्या मनात फक्त एकच विचार होता, माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये, जेणेकरून माझ्यामुळे सरांना पुन्हा दृश्य चित्रित करावे लागू नये. आज जे काही घडलं, त्यावर माझाच विश्वास बसत नाही.”
शाहरुख खान यांच्या व्यावसायिक वृत्तीचे कौतुक करताना अभय म्हणाला, “खरं सांगायचं तर शाहरुख सरांसारखा व्यावसायिक अभिनेता मी पाहिलेला नाही. त्यांची तब्येत ठीक नव्हती, तरीही त्यांनी कोणालाही त्याची जाणीव होऊ दिली नाही. खऱ्या अर्थाने हीच किंग असण्याची ओळख आहे!”

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

अभयने पुढे सांगितले की, दृश्याचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याने शाहरुख यांच्याशी आपल्या डायरीबद्दल चर्चा केली. त्यावेळी दोघांमध्ये थोडी मस्करीही झाली. चित्रीकरण संपल्यानंतर अभय कपडे बदलून पुन्हा सेटवर गेला. त्यावेळी शाहरुख यांचे चित्रीकरण सुरू होते. त्यांनी अभयला आपल्याजवळ बसवून घेतले. पूजा मॅमदेखील त्याच्याशी नेहमीच खूप प्रेमाने वागतात, असे त्याने सांगितले.

काही वेळाने मी त्यांची परवानगी

शाहरुख यांना अभिनय करताना पाहणे हा त्याच्यासाठी एक वेगळाच प्रेरणादायी अनुभव होता. अभयने पुढे लिहिले, “सरांनी नंतर मला खूप हसवलं. त्यांच्या हजरजबाबीपणापुढे सगळेच फिके आहेत. काही वेळाने मी त्यांची परवानगी घेतली आणि सेटवरून निघालो.”

आपला हा अविस्मरणीय अनुभव सांगताना अभयने लिहिले, “रात्री १२ वाजता घरी पोहोचलो आणि आजच्या दिवसाबद्दल लगेच लिहून ठेवावं, असं वाटलं. कारण त्यातील काही गोष्टी विसरायला नको होत्या. हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात सुंदर दिवस होता.’

Bandhu Marathi Movie: कधी भांडणं, कधी रुसवे तर कधी जीवापाड प्रेम! उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींच्या ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित

ज्या पद्धतीने सहज आणि आरामदायी वाटेल

सेटवर शाहरुख सर प्रत्येकाला, विशेषतः कलाकारांना ज्या पद्धतीने सहज आणि आरामदायी वाटेल असं वातावरण देतात, त्यावरून लोक त्यांच्यावर इतकं प्रेम का करतात आणि ते किंग का आहेत, हे समजतं. ते नेहमीच किंग राहतील. खरं तर ‘किंग’च्या सेटवर प्रत्येक वेळी जाणं एखाद्या स्वप्नासारखं वाटतं; पण आज माझं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं.”

दरम्यान, ‘ऑपरेशन सफेद सागर’ या आपल्या अलीकडील चित्रपटाच्या यशानंतर अभय वर्मा आता ‘किंग’मधील आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Abhay verma shares shah rukh khan king movie shooting experience rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Entertainment News: प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन! आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार
1

Entertainment News: प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन! आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा
2

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क
3

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड
4

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.