"फुल्ल बॅटिंग चालू…"; सुदेश म्हशिळकरनंतर प्रसिद्ध संगीतकाराचा प्राची पिसाटला विचित्र मेसेज
सध्या सोशल मीडियासह सर्वत्र अभिनेत्री प्राची पिसाट कमालीची चर्चेत आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर (Sudesh Mhashilkar) यांनी अभिनेत्रीला अश्लील मेसेज केला होता. त्या मेसेजेसचा स्क्रिनशॉट प्राचीने इन्स्टा स्टोरीवर देखील शेअर केलेला होता. अभिनेत्रीने सुदेश यांचं पितळ उघड केलं. अद्याप, सुदेश म्हशिळकरांनी या प्रकरणावर ना स्पष्टीकरण दिलंय ना माफी मागितलीये. सध्या सुदेश म्हशिळकर यांच्या अश्लिल मेसेजेसची जोरदार चर्चा सुरु असताना प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे (Rahul Ranade) यांनी प्राचीला विचित्र मेसेज केले आहेत. ज्याचे स्क्रिनशॉट स्वत: प्राचीने इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने स्क्रिनशॉट शेअर करत राहुल यांना खणखणीत उत्तर दिलं आहे.
दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर झाल्याचे निदान, भावनिक पोस्टद्वारे चाहत्यांना केली खास विनंती!
राहुल रानडे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार असून ते गेल्या ३० वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. अनेक मराठी नाटक, चित्रपट, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अशा नावाजलेल्या संगीतकाराने प्राची पिसाटला विचित्र मेसेज केले आहेत. त्यांनी केलेले मेसेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राहुल रानडे यांनी प्राचीला मेसेज केला की, “हॅलो PP, फुल बॅटिंग चालू आहे तुझी. हाहाहा…सगळ्या न्यूज पोर्टल्सने हा मुद्दा उचलून धरला आहे. खरंतर मी सुदेशला वैयक्तिकरित्या ओळखतो. मला एक सांग…त्याने नक्की कोणत्या वेळेला हे मेसेज केले होते? कारण सामान्यत: लोक रात्री नशेत असे मेसेज करतात.”
Prachi Pisat Instagram Story
‘अॅनिमल’ साठी ४० लाख तर, Spirit साठी घेतले एवढे कोटी रुपये; तृप्ती डिमरीच्या फी मध्ये ९०% वाढ
राहुल रानडेंच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने खणखणीत उत्तर दिले आहे. रोखठोक प्रत्युत्तर देत प्राची म्हणाली की, “अजून एक नमुना… तू पागल आहेस का? काय बोलतोय कळतंय का? नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलं कारण होत नाही. ते गैरवर्तनच आहे. मी कोणाचंही मनोरंजन करण्याचा ठेका घेतलेला नाही. आणि कोणत्याही मुलीने मग ते वेळ, वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही. छोटं असो किंवा मोठं गैरवर्तन झालं, तर त्याविरोधात मुलीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुझी ही मानसिकता असेल तर तू नशेत असताना आत्ता तुझे किती चॅट बाहेर निघतील हे तुला कळणारही नाही.”
अभिमानास्पद! दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
घडलेल्या घटनेनंतर पाच दिवस उलटून गेले तरी सुदेश म्हशिळकर अजूनही गप्प आहेत. त्यांनी साधी माफी मागितलेली नाही, हेही प्राचीने स्पष्ट केलं. तसंच आपण कोणावर आरोप केलेले नाहीत फक्त स्क्रीनशॉट केले आहेत असंही ती म्हणाली.