अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
गेल्या काही दिवसांपासून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा जबरदस्त चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्यामुळे कुणाल कमालीचा प्रकाशझोतात आला होता. त्याने त्याच्या शोमध्ये उपमुख्यमंत्र्यांवर एक मिश्किल टीप्पणी केली होती, त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राज्यभरातील शिवसैनिकांकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. शिवाय त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली होती. आता सर्व या प्रकरणानंतर कुणाल अभिनेता प्रकाश राज सोबत दिसला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
दरम्यान, कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ठाणे की रिक्षा’ असं एक उपरोधिक गाणं बनवलं होतं. या गाण्याच्या माध्यमातून कुणालने उपमुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर कुणालच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्याच्याविरोधात शिवसैनिकांनी राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने कामराला फोन करत धमकी दिली होती. कुणालने तो तामिळनाडूमध्ये असल्याचं सांगितल्यावर तमिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ? ( ‘तमिलनाडू में कैसे पहुंचेगा भाई’) असं शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने म्हटलं होतं. शिंदे गटाचा कार्यकर्ता आणि कुणाल कामराची ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यासोबतच मीम्सही व्हायरल झाले होते.
शिंदे सैनिक: तूने CM साहब के बारे में क्या बोला?
कुणाल: वो CM नहीं डिप्टी CM हैंशिंदे सैनिक: किधर रहता है तू?
कुणाल: तमिलनाडुशिंदे सैनिक: किधर आने का?
कुणाल: तमिलनाडुशिवसैनिक: अभी तमिलनाडु कैसे पहुंचेगा भाई?
ग़ज़ब कॉमेडी चल रही है भाई 🤣😂🤣 pic.twitter.com/EccQkrIZ4a
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) March 24, 2025
नुकतंच टॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी कॉमेडियन कुणाल कामराची भेट घेतली होती. त्यांचा दोघांचाही फोटो स्वत: अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी फोटो शेअर करताना खोचक कॅप्शनही दिलं आहे. “तामिळनाडूला कसं पोहोचायचं भाई? सिंपल ऑटोने…” असं खोचक कॅप्शन त्यांनी दिलं आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये कधी खलनायक तर कधी कॉमिक पात्र साकारणारे प्रकाश राज सरकारविरुद्ध बोलून चर्चेत राहतात. ते कायमच निर्भयपणे आपले विचार व्यक्त करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आले आहेत. कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांची भेट झाली असून दोघांचाही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Tamilnadu kaise pahunchneka bhai ..?? Simple .. Auto mein @kunalkamra88 #justasking pic.twitter.com/3sLW7SA4k2
— Prakash Raj (@prakashraaj) April 11, 2025
६० वर्षीय आमिर खानने धरला नव्या प्रियेसीचा हात; कोण आहे गौरी स्प्रेट? Video Viral
२०१७ पासून कुणालने युट्यूबवर ‘शटअप कुणाल’ नावाचा कॉमेडी शो सुरु केला होता. या शोच्या माध्यमातूनच त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध मिळाली आणि या शोच्या माध्यमातूनच तो पॉप्युलर झाला. कुणालने त्याच्या युट्यूब चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. कुणालसाठी वाद हा प्रकार काही नवीन नाही. यापूर्वी ही तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबरोबर कुणाल कामराचा वाद झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या वादात कुणालने अद्यापही हार मानलेली नाही. तो सोशल मीडियावर सतत पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. तसेच याप्रकरणी तो माफी मागणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.