Deputy Chief Minister Ajit Pawar Inspect The Construction Of Suraj Chavan's House
सध्या सोशल मीडिया एन्फ्लूएंसर सूरज चव्हाण कमालीचा चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर सूरजला महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळाली. त्याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर त्याला पहिला चित्रपट मिळाला, उपमुख्यमंत्र्यांकडून घर देखील मिळालं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: सूरजची भेट घेतली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचे आदेश ही दिले होते. घराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर सूरजने उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. आता त्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यासंबंधित त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी सूरजने, दादांनी गरिबाच्या पोराला मदत केली, घराचं स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया सूरजने दिली होती. आता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सूरज चव्हाणच्या घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामामध्ये कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, असंही बांधकाम व्यावसायिकाला त्यांनी सांगितलं.
६० वर्षीय आमिर खानने धरला नव्या प्रियेसीचा हात; कोण आहे गौरी स्प्रेट? Video Viral
अजित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.” या पोस्टमध्ये काही फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये अजित पवार घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये ते उपस्थितांशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे.
बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
📍बारामती pic.twitter.com/GlFDQoqBCj
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 13, 2025
गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाण त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. येत्या २५ एप्रिलला ‘झापूक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात सूरज चव्हाण एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात सूरज चव्हाणसह पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, जुई भागवत हे कलाकारदेखील मुख्य भूमिकांत दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये जसे सूरजला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले, त्याप्रमाणेच त्याच्या या नवीन चित्रपटाला प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.