pratik gandhi shows disappointment as phule movie release date got postponed
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा स्टारर चित्रपट यापूर्वी ११ एप्रिलला रिलीज होणार होता. पण निर्मात्यांनी दोन आठवड्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला होता. त्या ट्रेलरमधील एका दृश्यावर ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला होता. यावरून आता अभिनेता प्रतीक गांधीने प्रतिक्रिया दिली आहे.
६० वर्षीय आमिर खानने धरला नव्या प्रियेसीचा हात; कोण आहे गौरी स्प्रेट? Video Viral
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)ने ७ एप्रिल रोजी चित्रपटाला ‘U’ प्रमाणपत्र दिले असून काही बदल देखील करण्यास सांगितले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएफसीने चित्रपटातून ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’, ‘मनुस्मृती जातिव्यवस्था’ हे शब्द काढून टाकण्याचे आणि जातिव्यवस्थेचे तपशीलवार वर्णन करणारा व्हॉइसओव्हर पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व आवश्यक बदल केले असल्याची माहिती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिलीये.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी कथा रूपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही कथा आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे. १० एप्रिल रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्या ट्रेलरमधील एका दृश्यावर ब्राह्मण समाजाने आक्षेप नोंदवला होता. ब्राह्मण महासंघातील काही महत्वाच्या लोकांनी चित्रपटात त्यांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याची माहिती दिली. त्या ट्रेलरमधील काही मुद्द्यांवर आक्षेपही घेण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलरवरुन झालेल्या गदारोळानंतर अभिनेता प्रतीक गांधीने प्रतिक्रिया दिली की, “मी एका ठिकाणी शूटिंग करतो होतो, तेव्हा मला समजलं की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावेळी मला खूप दु:ख झालं. कारण ११ एप्रिल ही तारीख चित्रपटाच्या अनुषंगाने खूप विशेष तारीख होती. कारण, त्या दिवशी महात्मा फुले यांची १९७ वी जयंती होती. जर चित्रपट त्या दिवशी रिलीज झाला असता तर तो इतिहासाचा भाग झाला असता. पण ठिके, जे होतं चांगल्यासाठीच होतं. निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. मात्र चित्रपटातला मूळ संदेश पुसला गेलेला नाही. काही लोकांनी ट्रेलरवरुनच आक्षेप घेतला आहे. त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहून मगच मत नोंदवावं. ट्रेलरमध्ये पाहून संदर्भ लागत नाही.”
‘फुले’ सिनेमा आता २५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. अनंत महादेवन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमता अभिनेत्री पत्रलेखासावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. सीबीएफसीने दिलेल्या सर्व सूचनांचं आम्ही पालन केले आहेत. त्या शिवाय, चित्रपटात असे काहीही नाही जे कोणत्याही समुदायाचा अपमान करेल. आम्ही चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलून वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती स्वत: दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिलीय. चित्रपटात ज्योतिराव फुलेंची भूमिका अभिनेता प्रतिक गांधी साकारली असून पत्रलेखाने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.