प्रार्थना बेहरेच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन, नावही ठेवलंय खास…
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रकाशझोतात आलेल्या प्रार्थनाने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्रार्थना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीची ही आनंदाची बातमी तिचे चाहतेही आनंदित झाले आहेत.
‘आश्रम ३’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहनकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही फोटोज् शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले फोटोज् मध्ये त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता हा चिमुकला पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून तो श्वानाचं पिल्लू आहे. प्रार्थना बेहरे इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीच्या घरी छोट्या श्वानाच्या पिल्लाचं आगमन झालं आहे. तिने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये तिच्या पतीला एक वचनही दिलं आहे. तिची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser
प्रार्थना आणि तिचा पती ॲनिमल लव्हर आहे, हे सर्वांनाच माहितीये. लग्नाआधी प्रार्थनाकडे गब्बर नावाचा श्वान होता. तर लग्नानंतर प्रार्थनाकडे आणि तिच्या नवऱ्याकडे सध्या ७ कुत्रे, गायी आणि १० ते १२ घोडे इतके प्राणी आहेत. एका मुलाखतीत प्रार्थना गंमतीमध्ये मी १५ ते १६ मुलांची आई आहे, असं म्हणाली होती. तिचं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. त्यांच्या घरात असणाऱ्या प्राण्यांच्या यादीमध्ये आणखी एका सदस्याचं आगमन झालं आहे. प्रार्थनाच्या घरी एका क्यूट श्वानाचं आगमन झालं आहे, त्यासाठी अभिनेत्रीने स्पेशल इन्स्टाग्राम पोस्टही लिहिलीये.
“माझं आणखी एक बाळ, ‘रील’… आपली गरज कोणाला आहे हे कुत्र्यांना बरोबर कळतं आणि आपल्या नकळत आपल्या आयुष्यातली पोकळी ते भरुन काढतात. अभिषेक, ‘रील’ला चांगलं नवीन घर दिल्याबद्दल आणि बेस्ट आयुष्य दिल्याबद्दल आभार. मी तुला कधीच निराश करणार नाही असं वचन देते.”, असं शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रार्थना म्हणालीये. प्रार्थनाच्या घरी हे क्यूट श्वानाचं पिल्लू ‘अक्षय्य तृतीये’च्या दिवशी आलं आहे. त्याला घरी आणल्यानंतर अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हे कुत्र्याचं पिल्लू प्रार्थनाच्या नवऱ्याने आणलं असून त्याने स्वत: तिला गिफ्ट केलं आहे. प्रार्थना आणि अभिषेकचं अलिबागला मोठं फार्महाऊस असून त्यांच्या तिथल्या फार्महाऊसवर बरेच पाळीव प्राणी आहेत. प्रार्थना आणि तिचा पती असे दोघंही ॲनिमल लव्हर आहेत.