Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्की सिरियाला शक्य तेव्हडी मदत करा! संवेदनशील अभिनेत्री प्रियंका चोप्राचं लोकांना आवाहन, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दु:ख व्यक्त

तुर्की आणि सीरियामध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यासोबतच अभिनेत्रीने लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2023 | 10:44 AM
तुर्की सिरियाला शक्य तेव्हडी मदत करा! संवेदनशील अभिनेत्री प्रियंका चोप्राचं लोकांना आवाहन, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दु:ख व्यक्त
Follow Us
Close
Follow Us:

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानंतर (Turkey Syria Earthquake) दोन्ही देशांमध्ये विध्वंस झाल्याचे चित्र आहे. या भूकंपात आतापर्यंत 36 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशा परिस्थितीत संपुर्ण जगाच लक्ष तुर्कस्तान आणि सीरियावर लागलेलं दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला विध्वंस अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) देखील दुःख व्यक्त केले आहे आणि लोकांना तुर्कस्तान आणि सीरियाला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

[read_also content=”भिकेला लागला पाकिस्तान! कराचीमध्ये दूध 210 रु प्रति लिटर तर 700 चिकन रु. प्रति किलो, आता संरक्षण बजेट कमी करण्याचा विचार https://www.navarashtra.com/world/n-karachi-milk-costs-rs-210-per-liter-and-chicken-costs-rs-700-per-kg-now-consider-reducing-the-defense-budget-in-pakistan-nrps-369616.html”]

प्रियांकाने फोटो केले शेयर

तुर्की आणि सीरियामध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यानचा व्हिडिओ प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये लोकांची असहायता स्पष्टपणे दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये बचाव पथक ढिगाऱ्याखाली दबलेल्या चिमुकल्या जीवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी दगड फोडताना दिसत आहेत. तसेच सर्वत्र ढिगाऱ्यांच्या ढिगाऱ्यात बदललेल्या इमारती दिसत आहेत.

ही पोस्ट शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले की, ‘एक आठवड्यानंतरही विनाशकारी भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियातील लोकांच्या वेदना आणि त्रास सुरूच आहे. बचाव कार्य सुरूच आहे, ज्यामुळे काही आशादायक क्षण आले जेथे 3 महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. असे बरेच लोक आहेत जे अजूनही अडकले आहेत, वाट पाहत आहेत आणि वाचण्याची आशा बाळगून आहेत, त्यांचे कुटुंबीय चमत्कारासाठी प्रार्थना करत आहेत. हे हृदयद्रावक आहे. निसर्ग कोणालाही सोडत नाही परंतु आपण सर्वजण मदत करू शकतो. तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचे तपशील माझ्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आहेत. मला आशा आहे की तुम्ही जमेल तशी मदत कराल.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. याआधी ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता आणि त्यानंतर ७.५ रिश्टर स्केलचे धक्के बसले होते, या दोन्ही देशांत विध्वंसाचे दृश्य निर्माण झाले होते. या दोन देशांमध्ये आतापर्यंत 36 हजार लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 80 हजार लोक जखमी झाले आहेत, ज्यांची संख्या वाढू शकते. त्याच वेळी, ढिगाऱ्यात अडकलेल्या हजारो जीवांना वाचवण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

Web Title: Priyanka chopra appeal to puplic through instagram to help turkey syria amid earthquake nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2023 | 10:44 AM

Topics:  

  • Entertainmnet
  • Priyanka chopra
  • Turkey Syria Earthquake

संबंधित बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”
1

मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”

पती निक जोनासच्या वाढदिवशी पत्नी प्रियांका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव; पाहा PHOTOS
2

पती निक जोनासच्या वाढदिवशी पत्नी प्रियांका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव; पाहा PHOTOS

प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…
3

प्रियंका चोप्राच्या अफेअरबद्दल प्रल्हाद कक्कर यांचा धक्कादायक खुलासा…

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा
4

प्रियांकाच्या त्या पोस्टमध्ये अभिनेत्री रेखा होती का? असं काय लिहलंय पोस्टमध्ये की सर्वत्र होतेय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.