Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh Grandfather Death: रणवीर सिंहच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; ९६व्या वर्षी आजोबांचं निधन, बहिणीने शेअर केली भावुक पोस्ट

Ranveer Singh Grandfather Death: रणवीर सिंहचे आजोबा डॉ. राम हिंगोराणी यांचं दिवाळीच्या दिवशी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झालं. चुलत बहीण सौम्या हिंगोराणीने भावुक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 11:43 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ranveer Singh Grandfather Death: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या कुटुंबातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. रणवीरचे आजोबा डॉ. राम हिंगोराणी यांचं दिवाळीच्या दिवशी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झालं. ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजेच्या वेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणवीरची चुलत बहीण सौम्या हिंगोराणी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आजोबांच्या निधनाची माहिती दिली. मात्र, दुःख व्यक्त करण्याऐवजी तिने त्यांच्या आयुष्यातील सुंदर आठवणींना उजाळा देत त्यांना ‘रॉकस्टार’ म्हटलं आहे.

नातीने आजोबांसाठी शेअर केली भावुक पोस्ट

सौम्या हिंगोराणीने मंगळवारी रात्री इन्स्टाग्रामवर डॉ. राम हिंगोराणी यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. कुटुंबातील सर्वजण त्यांना प्रेमाने ‘दादू’ म्हणत असत. या पोस्टमध्ये सौम्याने आजोबांसोबतच्या आठवणी सांगताना त्यांच्या आयुष्याचा आनंद साजरा केला.

तिने लिहिलं, “वयाच्या ९६व्या वर्षी… हे एक अद्भुत आयुष्य होतं, जे साजरं करण्यासारखं आहे, शोक करण्यासारखं नाही. माझे आजोबा डॉ. राम दिवाळीच्या दिवशी माझ्या आजीकडे जाण्यासाठी शांतपणे आम्हाला सोडून गेले. त्यांनी यापेक्षा अधिक शुभ वेळ निवडली नसती.”

पुढे तिने लक्ष्मीपूजेच्या खास क्षणाचा उल्लेख करत लिहिलं की, दिवसातील सर्वात खास वेळी, लक्ष्मीपूजेच्या वेळी आजी-आजोबा एकत्र असतील. दोघेही खुर्च्यांवर बसून व्हिस्की पीत असतील आणि आपल्याला एकत्र पाहून आनंदी असतील, अशी भावना तिने व्यक्त केली.

“जगातील सर्वोत्तम आजोबा असल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला सर्व काही दिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा एकत्र नाचेपर्यंत माझ्यासाठी आईस्क्रीमचा एक स्कूप वाचवून ठेवा. हरी ओम,” अशा शब्दांत सौम्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

रणवीर सिंहही आजोबांच्या होता खूप जवळ

रणवीर सिंहचं आपल्या आजोबांशी खास नातं होतं. अभिनेता अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे. आजोबांचाही रणवीरप्रमाणेच उत्साही आणि दिलखुलास स्वभाव होता. त्यांच्या व्हिडिओंमधून त्यांचं विनोदी व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य जगण्याची जिद्द दिसून येत असे.

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

वयाच्या ९३व्या वर्षीही आजोबांचा जबरदस्त उत्साह

२०२३ मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरने आजोबांचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये डॉ. राम हिंगोराणी चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘क्या झुमका’वर थिरकताना दिसले होते. विशेष म्हणजे, त्यांनी ‘टीम रॉकी’ असलेला टी-शर्ट घातला होता.

त्यावेळी त्यांचं वय ९३ वर्षं होतं, तरीही त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. व्हिडिओमध्ये ते रणवीरला गंमतीने म्हणाले होते, “टिक्की सोडून दे, माझ्यासाठी थोडी टकीला आण.”

हा व्हिडिओ शेअर करताना रणवीरने, “नाना खऱ्या रॉकीसारखे रॉक करत आहेत! वयाच्या ९३व्या वर्षीही रॉक करत आहेत!!!” असं कॅप्शन दिलं होतं. आजोबांच्या निधनानंतर त्यांचे हे जुने व्हिडिओ आणि आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?

Web Title: Ranveer singh grandfather death dr ram hingorani saumya hingorani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Entertainmnet
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!
1

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार
2

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो
3

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

Ramayana Movie Collection: ‘रामायणम्’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; दिवाळीत केली जोरदार कमाई, चार दिवसांत रचला नवा विक्रम
4

Ramayana Movie Collection: ‘रामायणम्’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; दिवाळीत केली जोरदार कमाई, चार दिवसांत रचला नवा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.