एक यशस्वी अभिनेत्री, बिझनेस वुमन, ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कायम चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे वैयत्तिक आयुषातील अपडेटही ती सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देसी गर्ल सध्या मुंबईत आली आहे, आणि आली तेव्हापासून ती चर्चेत आहे. याच कारण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि बुल्गारीने शुक्रवारी संध्याकाळी अंबानी हाऊस अँटिलिया येथे रोमन होळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अँटिलियामध्ये झालेल्या या पार्टीत बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी हजेरी लावली. यावेळी मात्र, प्रियांकाच्या लूकनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. गाऊनसारखी साडी परिधान केलेली प्रियंका बॉस खूपच सुंदर दिसत होती.
[read_also content=”अमिताभ बच्चन यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट, रुग्णालयात दाखल झाल्याच्या वृत्ताला स्व:ताच म्हणाले फेक न्यूज… https://www.navarashtra.com/movies/amitabh-bachchan-denies-rumours-of-hospitalization-and-angioplasty-says-fake-news-nrps-515643.html”]
शुक्रवारीअँटिलिया येथे एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. ईशा अंबानीने बुल्गारीच्या सहकार्याने होळी पार्टीचं आयोजन केलं होत. कार्यक्रमासाठी सर्व स्टार्स वेगवेगळ्या लूकमध्ये हजेरी लावली. प्रियंकानेदेखील या पार्टीला हजेरी लावली होती. प्रियांका ही बुल्गारीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियंकाने या पार्टीसाठी ब्लूश पिंक साडीचा गाऊन निवडला होता. थाय हाय स्लिट आणि लो नेकलाइन ब्लाउज घालून प्रियंका अतिशय सुंदर दिसत होती. यावर तिने स्मोकी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि साध्या वेव्ही हेअरस्टाइलने केली होती. या गेटअपमध्ये प्रियकांने पापाराझींसमोर भरपूर पोज दिल्या. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.