मन्नारा चोप्राच्या वडिलांचे निधन, चोप्रा कुटुंबीयांवर कोसळला दु: खाचा डोंगर
बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस १७’ फेम अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मन्नारा चोप्राचे वडील रमन रॉय हांडा यांचे निधन झाले आहे. त्यांचे आज (सोमवार- १६ जून २०२५) प्राणज्योत मालवली आहे. स्वत: मन्नाराने वडिलांच्या निधनाचे वृत्त चाहत्यांना दिले आहे. अभिनेत्रीने स्वत: इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे आज दिल्लीत निधन झाले. ते प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे मामा होते.
सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह आणि टीम उभी ठाकणार, Special Ops 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
मन्नारा चोप्राचे वडिल फिल्म इंडस्ट्रीतील नाही, ते पेशाने वकील होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सहवासात पत्नी कामिनी आणि मुलगी मन्नारा आणि मिताली यांचा समावेश आहे. नेमकं त्यांचं कोणत्या आजारामुळे निधन झाले आहे, ही माहिती तरी गुलदस्त्यातच आहे. काही वेळापूर्वीच मन्नाराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हांडा कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन राय हांडा यांच्यावर अंत्यसंस्कार येत्या १८ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील अंबोली स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. मन्नारा चोप्रावर दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर तिच्या प्रती चाहते दु:ख व्यक्त करताना दिसत आहे. मन्नाराला आणि तिच्या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती देवाकडे मागताना दिसत आहे.