Trailer released for Special Ops 2 starring Kay Kay Menon
बॉलिवूड अभिनेता के के मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी ‘स्पेशल ऑप्स’ (Special Ops) वेब सीरीज प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर विशेष आवडली. ‘स्पेशल ऑप्स १’ आणि ‘स्पेशल ऑप्स १.५’ मध्ये प्रेक्षकांना हिंम्मत सिंग कसा घडला हे कथानकातून पाहायला मिळालं. आता ‘स्पेशल ऑप्स सीझन २’ (Special Ops 2) वेबसीरीजमध्ये सर्व Raw Agents नव्या मिशनवर जाणार आहेत. नुकतीच सीझनच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून के के मेनन अर्थात कर्तव्यदक्ष आणि तडफदार हिम्मत सिंग अनोख्या अंदाजात भेटीला येणार आहे.
‘चाल तुरु तुरु’नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली
नुकतंच ‘स्पेशल ऑप्स २’या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही तासांपूर्वीच ‘जिओ प्लस हॉटस्टार’ने या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘स्पेशल ऑप्स २’मध्ये केके मेनन मुख्य भूमिकेत आहे. त्याने चित्रपटात कर्तव्यदक्ष आणि तडफदार अधिकाऱ्याची साकारली आहे. ‘स्पेशल ऑप्स २’ वेबसीरीज येत्या ११ जुलै २०२५ पासून ‘जिओ प्लस हॉटस्टार’वर स्ट्रीम होणार आहे. या अॅक्शन थ्रिलर सीरिजमध्ये के. के मेनन सोबत विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूरसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्पेशल ऑप्स २’कडून चाहत्यांना मोठी अपेक्षा असून ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये…’ राजेश्वरी खरातने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये हिंम्मत सिंगसह त्याची टीम एका नव्या नव्या मिशनवर जाणार आहेत. या सीरीजमध्ये प्रेक्षकांना सायबर दहशतवाद विरोधात हिंम्मत सिंह लढताना दिसणार आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हिंम्मत सिंग त्याच्या टीमसोबत लढताना दिसणार आहे. के. के मेनन यांनी ‘स्पेशल ऑप्स २’मधील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगितलं की, “हिम्मत सिंग नेहमीच शौर्य, बुद्धिमत्ता आणि अनुभवाच्या बळावर लढला आहे. पण, यावेळी युद्ध दिसत नाहीये, धोके मोठे आणि अज्ञात आहेत. ज्यामुळे हा सीझन केवळ प्रासंगिकच नाही, तर माझ्यासाठी एक अतिशय वैयक्तिक अनुभवही बनला आहे. हिम्मत सिंगच्या खांद्यावर जबाबदारी, त्याग आणि इतर अनेक गोष्टींचे ओझे आहे. यावेळी मला केवळ एक रणनीतिकारच नाही तर या मोहिमेमागील माणूस म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली, जो एक पिता, देशभक्त आणि खरा रक्षक आहे.”