पंजाबी पॉप गायक Dil Sandhu ने वाढदिवसानिमित्त स्वतः ला गिफ्ट केलं 3 कोटींचं लक्झरी घड्याळ
पंजाबी पॉप कल्चर आपल्या सगळ्यांचा ठाऊक आहे. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अनेक रॅपर आणि पॉप गायक पाहायला मिळतात. असाच एक लोकप्रिय पॉप गायक म्हणजे दिल संधू. नुकतेच दिल संधूने त्याचा वाढदिवस साजरा केला आणि स्वतःला एक खास गिफ्ट दिलं. चला याबद्दल जाणून घेऊयात.
पंजाबी पॉप सेन्सेशन दिल संधूने आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी स्वतःसाठी काही खास केलं नाही. ‘14 किल्ले’ आणि ‘रेड’ यासारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या कलाकाराने सोशल मीडियावर आपल्या नवीन लक्झरी खरेदीची झलक दाखवली आणि ही खरेदी म्हणजे एक लिमिटेड एडिशनचं लाल रंगाचं घड्याळ, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी आहे. हे स्पष्ट आहे की दिल संधूला आपल्या मेहनतीचा अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या यशाचा उत्सव साजरा करण्यात कोणतीही कमी ठेवलेली नाही. शेवटी, स्वतःवर प्रेम करणे हेच सर्वात मोठं प्रेम असतं.
लग्नाच्या दोन वर्षानंतर पतीपासून वेगळी होणार हंसिका मोटवानी ? धक्कादायक सत्य आले समोर
हे लक्झरी घड्याळ खरेदी केल्यानंतर दिल संधू म्हणाला की,”हे घड्याळ पैशाच्या किंमतीसाठी नाही, तर वेळेची किंमत समजून घेणं, आपल्या प्रगतीचा सन्मान करणं आणि आतापर्यंतच्या प्रवासाचं उत्सव आहे.”
दिल संधूने आपल्या करिअरची सुरुवात चंदीगडमध्ये एक गीतकार म्हणून केली होती आणि आज ते पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील मोठ्या नावांपैकी एक आहेत. हे घड्याळ त्यांच्या साठी फक्त एक वस्तू नाही, तर त्यांच्या मेहनतीचं, संघर्षाचं आणि यशाचं प्रतीक आहे.
दिल संधू पुढे म्हणोत, “मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा माझ्याकडे फक्त एक पेन आणि एक स्वप्न होतं. या वाढदिवशी मी हे घड्याळ दाखवण्यासाठी घेतलं नाही, तर स्वतःला हे आठवण करून देण्यासाठी घेतलं की मेहनत फळ देते. स्वतःवर इतकं प्रेम करा की तुम्ही कधीच हार मनू नका, पण इतकं जमिनीवर देखील रहा की सुरुवात कुठून झाली हे विसरू नका.”
सध्या दिल संधूच्या बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या चर्चा सुरू आहेत आणि काही आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत त्यांच्या नवीन गाण्यांचीही तयारी सुरू आहे. त्यांचा हा वाढदिवस फक्त अजून एक वर्ष वाढल्याचा नाही, तर त्यांच्या आयुष्यातील नव्या आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात आहे.