सौजन्य- Instagram
बॉक्स ऑफिस: करण जोहर आणि गुनीत मोंगा निर्मित आणि निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात लक्ष्य आणि राघव जुयाल मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या थरारपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली का हे जाणून घेऊया?
पहिल्या दिवशी किती केला व्यवसाय?
सध्या, प्रभास, दीपिका पदुकोण आणि बिग बी स्टारर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत आहे. ज्याचा परिणाम इतर चित्रपटांच्या कलेक्शनवरही दिसून येत आहे. दरम्यान, राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांचा ‘किल’ चित्रपटही नाग अश्विनच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता त्याच्या ओपनिंग डे कलेक्शनचा अंदाजही समोर आला आहे. किल चित्रपट पहिल्या दिवशी जवळजवळ 1 करोडचा व्यवसाय करणार आहे . चित्रपटाच्या आकारमानाचा विचार केला तर 1-2 कोटींची ओपनिंग अपेक्षित होती. ओपनिंग वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. शनिवार, रविवार ‘किल’ साठी महत्वाचा असणार आहे जर या दिवशी किलने प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळविले तर बॉक्स ऑफिसवर किलची चलती असेल.
किलची कथा?
किलची कथा हत्येच्या कटावर आधारित आहे. यामध्ये एनएसजी कमांडो अमृत (लक्ष्य) प्रेयसीला भेटण्यासाठी दिल्लीला जातो, त्याच ट्रेनमध्ये दरोडा टाकण्याच्या इराद्याने फणी (राघव जुयाल) सोबत दरोडेखोरांचा एक गट प्रवेश करतो. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
सध्या प्रेक्षकांचा ओढा ‘कल्की 2898 एडी’कडे आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रंचड आवडत असून अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. जर बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास कल्कीने फक्त देशात तब्बल ४०० करोडहून जास्त कमाई केली आहे. कल्की या वर्षातील आता पर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे