समोर आलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या याचिकेत म्हटले आहे की, या कथित गुन्ह्यातून त्याने आर्थिक किंवा अन्य प्रकारचा नफा कमावल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. शिवाय, फिर्यादीने त्याच्यावर गुन्हेगारी हेतूचा कोणताही आरोप लावलेला नाही. अशी याचिका राज कुंद्राच्या वकिलांनी दाखल केली आहे. न्यायालयाने फिर्यादी पक्षाला ८ सप्टेंबर रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
गेल्या वर्षी हा मुद्दा खूप चर्चेत आला होता. या प्रकरणात अनेक बाबी समोर आल्या होत्या. एका महिलेने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर सुरुवातीला राज कुंद्रा आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली. नंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले. राजवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 420 (फसवणूक), 292 आणि 293 (अश्लील जाहिराती आणि प्रदर्शनाशी संबंधित) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी राज कुंद्राच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहू येथील बंगल्यावरही छापे टाकले. राजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता. त्याच्या सुटकेच्या काही महिन्यांनंतर राज कुंद्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण घटना म्हणजे त्याच्याविरुद्ध एक भव्य कट होता.