Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीमध्ये येणार, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट

१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आनंद' चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद त्यांच्या मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्नांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 28, 2024 | 02:31 PM
राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती 'आनंद' मराठीमध्ये येणार, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती 'आनंद' मराठीमध्ये येणार, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट

Follow Us
Close
Follow Us:

१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका ‘आनंद’ आता मराठमोळे रूप लेऊन समोर येणार आहे. विघ्नहर्ता फिल्म्सने मराठी भाषेत ‘आनंद’ चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी ‘आनंद’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

कसली क्यूट दिसतेय… राहा कपूरने पापाराझींना बाय म्हणत दिली क्यूट फ्लाईंग किस; आलिया- रणबीरच्या लेकीचा गोंडस Video पाहिला का ?

विघ्नहर्ता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते दिलीप शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आजवर नेहमीच संगीतप्रधान आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे हेमंतकुमार महाले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वाद्यवृंद जगतात ‘शोमॅन ऑर्गनायझर’ म्हणून जगविख्यात असलेले हेमंतकुमार महाले यांच्या ‘काळी माती’ या चित्रपटाला एका वर्षात ४४४ उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यातील १०६ पुरस्कार हे केवळ दिग्दर्शनासाठी आहेत आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी’ने घेतली आहे. ‘आनंद’ प्रदर्शित झाल्यावर हृषिकेश मुखर्जी जेव्हा नाशिकला गेले होते, तेव्हा त्यांनी कुसुमाग्रजांना आपल्यासोबत ‘आनंद’ बघण्याची विनंती केली होती. इतकेच नव्हे तर सिनेमा पाहिल्यावर ‘आनंद’चे नाट्यरूपांतर करण्याचा आग्रहही मुखर्जींनी कुसुमाग्रजांना केला होता. त्यानंतर आपला अस्तकाल एका बेहोश धुंदीत व्यतीत करणाऱ्या नायकाच्या कथेवर स्वत:च्या काव्यात्म प्रतिभेचे संस्कार करत कुसुमाग्रजांनी ‘आनंद’ नावाचे एक भव्य नाट्य लिहिले. या नाटकावर मराठी ‘आनंद’ आधारलेला आहे.

जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’; पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर, रिलीज डेट समोर

‘आनंद’मध्ये मराठी रसिकांच्या आवडीनिवडी आणि बदललेल्या काळानुरूप काही बदल करण्यात येणार असले तरी मूळ गाभा तसाच ठेवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट जिथे संपला, त्याच्या पुढेही मराठी ‘आनंद’ जाणार असल्याचे संकेत दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कुसुमाग्रजांचे संवाद आणि कवितांचा योग्य वापर चित्रपटात करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘आनंद’चा लुक बदलला जाईल. सुमधूर संगीताची नेत्रसुखद नृत्यासोबत सांगड घातली जाईल. कथानकातील गाण्यांच्या जागा बदलून मराठी चित्रपटाचे नावीन्य जपण्यात येईल. काही नवीन व्यक्तिरेखा आणि दृश्यांचा समावेशही केला जाईल. ‘आनंद’च्या नायिकेचे सादरीकरण सरप्राईज पॅकेज ठरेल. चित्रपटाच्या शेवटी एक उत्कंठावर्धक दृश्य वाढवण्यात येणार आहे. याखेरीज नयनरम्य लोकेशन्सवर ‘आनंद’चे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही महाले म्हणाले.

Bigg Boss 18 च्या घरात होणार सलमानच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन, हे कलाकार होणार सामील

राजेश खन्नांनी साकारलेल्या ‘आनंद’च्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल आणि त्यांना साथ देणाऱ्या अमिताभ यांनी सादर केलेला डॅा. भास्कर बॅनर्जी म्हणजेच बाबूमोशाय कोण बनणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे कलाकारांची निवड झाल्यावर समोर येतील. ‘आनंद’मध्ये दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी डॅा. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. या चित्रपटात ती व्यक्तिरेखा कोणत्या कलाकाराच्या वाट्याला येते ते पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कलाकारांची निवड करणे हे मोठे कठीण काम चित्रपटाच्या टिमसमोर आहे. डिओपी सुरेश सुवर्णा या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. कला दिग्दर्शन निलेश चौधरी करणार असून, अविनाश-विश्वजीत ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची संगीतकार जोडी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहे.

Web Title: Rajesh khanna and amitabh bachchan starrer anand hindi movie announced marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Hindi Movie
  • marathi film

संबंधित बातम्या

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज
1

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
2

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”
3

माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”

रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम
4

रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.