जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा 'लव्हयापा'; पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर, रिलीज डेट समोर
अमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खानसाठी (Aamir Khan Son) २०२४ हे वर्ष खूपच खास ठरलं आहे (Junaid Khan). त्याचा पहिला सिनेमा त्याच्यासाठी खास ठरला आहे. त्याने ‘महाराज’ (Maharaj Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ‘नेटफ्लिक्स’ (Netflix OTT) या ओटीटी ॲपवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्याचं सर्वत्र कौतुकंही करण्यात आलं होतं. आता त्यानंतर जुनैद एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानचा मुलगा अपकमिंग चित्रपटामध्ये श्रीदेवी यांची लेक खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) स्क्रिन शेअर करणार आहे. नुकतीच जुनैद-खुशी यांच्या थिएटरल डेब्यू फिल्मची रिलीज डेटही समोर आली आहे.
Baby John: कीर्ती सुरेशला ‘बेबी जॉन’मध्ये काम केल्याचा होतोय पश्चाताप? डेब्यू चित्रपट ठरला फ्लॉप!
मुख्य बाब म्हणजे, जुनैद आणि खुशीचा हा थिएट्रिकल पहिला चित्रपट असणार आहे. दोघांचाही करियरमधला पहिला चित्रपट ओटीटीवरीलच होता. आता त्यामुळे त्यांच्या थिएटरवरील चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. जुनैद आणि खुशीचा पहिल्याच थिएट्रिकल चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार असून ‘लव्हयापा’ असं चित्रपटाचं नाव आहे. फँटम स्टुडिओ आणि झी स्टुडिओजने एकत्रित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. खुशी कपूर आणि जुनैद खान हे दोघंही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्रित दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली असल्याची माहिती आहे. फँटम स्टुडिओद्वारे इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिलंय की, “सिच्युएशनशिप की रिलेशनशिप? लव्ह का सियाप्पा की लव्हयापा? येत्या ७ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट थिएटमध्ये पाहा. ” अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘लव्हयापा’मध्ये रोमान्ससोबतच कॉमेडीचा टचही पाहायला मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
Sikandar Teaser: ‘सिकंदर’च्या टीझरची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना धक्का; पुन्हा वेळेत केला बदल!
‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रदीप रंगनाथन आणि रवीना रवी दिसले होते. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप रंगनाथननेच केलं होतं. ‘लव्हयापा’ हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित असेल. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीत या सर्व गोष्टीने परिपूर्ण असणारा हा चित्रपट आहे. जुनैद खानने ‘महाराज’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तर, खुशी कपूरने झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.