कसली क्यूट दिसतेय... राहा कपूरने पापाराझींना बाय म्हणत दिली क्यूट फ्लाईंग किस; आलिया- रणबीरच्या लेकीचा गोंडस Video पाहिला का ?
राहा कपूर, आलिया भट्ट् आणि रणबीर कपूरची लेक आहे. खरंतर राहा कपूर इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. राहाच्या क्यूटनेसची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. ख्रिसमसच्या दिवशी राहाचा एक क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर समोर आला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा राहाचा क्यूट व्हिडिओ समोर आला आहे. राहा कपूर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एअरपोर्टवरील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राहाने दिलेल्या एक्सप्रेशन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
राहा कपूर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एअरपोर्टवरील व्हिडिओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेले आहे. या शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत राहा, आलिया आणि रणबीर एकत्र दिसत असून आलियाच्या कडेवर राहा बसलेली दिसत आहे. तिघेही एअरपोर्टवर येताच आईच्या कडेवर बसलेली राहा तिच्या क्यूट आवाजात पापाराझींना बाय म्हणताना दिसते. त्यानंतर तिने पापाराझींना फ्लाईंग किसही दिला. राहाचा हा गोंडस अंदाज कमालीचा चर्चेत आला असून तिचे एक्सप्रेशन पाहून आलियाला आणि रणवीरला दोघांनाही हसू आवरत नाहीये. तिच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, राहाचा हा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कपूर कुटुंब परदेशात जात आहे. शुक्रवारी रणबीर, आलिया राहाबरोबर न्यू इअर सेलिब्रेशनसाठी परदेशात जाताना पाहायला मिळाले. मुंबई विमातळावर मायलेकी मॅचिंग कपड्यांमध्ये तर रणबीर निळ्या रंगाचा शर्ट, जीन्समध्ये दिसला. राहाच्या क्यूट अंदाजामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. राहा कपूरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. “राहा खूपच गोड आहे.”, “व्हिडीओमध्ये राहा आपल्या आई- वडिलांपेक्षा मोठी स्टार वाटतं आहे.”, “राहा खरंच किती क्यूट आहे आणि तिचा आवाजही किती गोड आहे”, “राहा बॉलिवूडची सर्वात जास्त गोड मुलगी आहे.” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्हिडिओवर दिलेल्या आहेत.
जुनैद खान अन् खुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’; पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर, रिलीज डेट समोर
दरम्यान, आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं. त्याचवर्षी, ६ नोव्हेंबर रोजी आलियाने राहाला जन्म दिला. सध्या राहा दोन वर्षांची आहे. तिचा दुसरा वाढदिवस नुकताच साजरा केला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर आणि रणबीरने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. राहा तिच्या क्यूट अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.