“याला म्हणतात संस्कार...”, रणबीर कपूर- आलिया भट्टच्या ‘त्या’कृतीचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक; Video Viral
आदर जैन आणि आलेखा अडवाणीने २१ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. आदर आणि आलेखाने हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे लग्न केलं. त्यापूर्वी या दोघांनीही गोव्यात ख्रिश्चिन पद्धतीने लग्नगाठ बांधली होती. आदर जैन हा करीना- करिष्मा, रणबीर कपूरचा आत्ये भाऊ आहे. आदर- अलेखाच्या लग्नसोहळ्यात कपूर कुटुंबासह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. आदर- आलेखाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या एका कृतीने नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. बॉलिवूडच्या या लाडक्या जोडप्याने नेमकं काय केलं? जाणून घ्या…
Drishyam 3: ‘दृश्यम ३’ मध्ये अजय देवगण सादर करणार एक नवी कथा, या तारखेपासून शूटिंग होणार सुरू !
रणबीर- आलियाचा सध्या आदर- आलेखाच्या मेहंदी सोहळ्यातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मेहंदी सोहळ्यात बाकी आलिया कमालीचा भाव खाऊन गेली. तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. मेहंदी सोहळ्यात आलियाने पिवळ्या रंगाचा भरजरी शरारा घातला होता. यावर तिने मोठे कानातले आणि न्यूड मेकअप केला होता. तर आलियाने हटके हेअरस्टाइल केली होती. तिने केसांची वेणी घातली होती, ज्यामध्ये निळ्या रंगाची रिबन होती. आलियाच्या याच हटके वेणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
तर रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता सेटवर जॅकेट घातलं होतं. मेहंदी सोहळ्यातील रणबीर- आलियाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघं कुटुंबातील मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. रणबीर-आलिया प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन खाली वाकून त्यांच्या पाया पडताना पाहायला मिळत आहेत. दोघांच्या याच कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. रणबीर- आलियाच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांनी ‘आदर्श जोडपं’ असा टॅगही दिला आहे.
“‘छावा’ सब पर भारी है…” आठव्या दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस; कमाईच्या बाबतीत अक्षय आणि अजयलाही मागे टाकले
१३ जानेवारीला गोव्यामध्ये फॅमिली आणि फ्रेंड्सच्या उपस्थितीत आदर- आलेखाने ख्रिश्चिन पद्धतीने लग्नगाठ बांधली. आता त्यानंतर २१ फेब्रुवारीला आदर आणि आलेखाने हिंदू रिती-रिवाजानुसार लग्नागाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. यांच्या लग्नादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. करीना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा साहनी, रेखा, आकाश अंबानी- श्लोका मेहता, अनिल अंबानी, बोनी कपूर, निखिल नंदा, अगस्त्य नंदा, शाहरुख खान-गौरी खान, सुहाना खान, अनन्या पांडे असे दिग्गज सेलिब्रिटी मंडळी आदर- आलेखाच्या लग्नात पाहायला मिळाले होते.