(फोटो सौजन्य - x अकाउंट)
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाने लोकांची मने जिंकली. अजय देवगणने चित्रपटात जबरदस्त अभिनय केला. हा चित्रपट इतका हिट झाला की चित्रपट निर्मात्यांनी सात वर्षांनी ‘दृश्यम २’ हा चित्रपट लगेच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. पिंकव्हिलाच्या मते, आता अजय देवगण ‘दृश्यम ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची कथा एका नव्या रहस्यसह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची शूटिंग आता लवकरच सुरु होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
इतर चित्रपटांऐवजी ‘दृश्यम ३’ चे चित्रीकरण करणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणची पुन्हा एकदा ‘दृश्यम ३’ साठी निवड झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘अजय देवगण जुलै ते ऑगस्ट या काळात इतर चित्रपटांचे शूटिंग करणार होता पण आता तो ‘दृश्यम ३’ मध्ये काम करणार आहे. काही आठवड्यांपूर्वी अभिषेक पाठक आणि लेखक अजय देवगणच्या घरी गेले आणि त्यांना ‘दृश्यम ३’ बद्दल सांगितले. यानंतर, अजय देवगणने दृश्यम ३ मध्ये काम करण्यास होकार दिला. या चित्रपटात अजय विजय साळगावकर यांची भूमिका पुन्हा साकारण्यासाठी उत्सुक आहे.
या चित्रपटांमध्ये करणार काम
‘दृश्यम ३’ च्या शूटिंगपूर्वी अजय देवगण ‘दे दे प्यार दे २’, ‘धमाल ४’ आणि ‘रेंजर’ चे शूटिंग पूर्ण करताना दिसणार आहे. अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे २’ हा चित्रपट आधीच प्रदर्शित झाला आहे, ‘धमाल ४’ चे शूटिंग मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. तो मे महिन्यात “रेंजर” चे चित्रीकरण सुरू करणार आहे. तसेच आता ‘दृश्यम ३’ मध्ये अभिनेत्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झाले आहेत.
या वर्षी अजय देवगणच्या रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये हे कलाकार
एका सूत्राने सांगितले की, अजय देवगण २०२५ च्या अखेरीपर्यंत व्यस्त असेल. या काळात तो ‘दे दे प्यार २’, ‘धमाल ४’, ‘रेंजर’ आणि ‘दृश्यम ३’ चे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्याला त्याच्या चित्रपटांबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. तो प्रत्येक चित्रपटात वेगवेगळी पात्रे साकारत आहे. ‘दृश्यम ३’ नंतर, अजय देवगण ‘गोलमाल ५’ चे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाची पटकथा लिहिली जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल याबद्दल अद्यापही समोर आलेले नाही आहे. अजय देवगण लवकरच ‘रेड २’ आणि ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये दिसणार आहे.