अखेर कृष्णराज महाडिकने सोडले मौन, म्हणाले 'रिंकू माझी...', सून होणार की नाही? प्रकरणावर पडला पडदा
‘सैराट’ चित्रपटातून एकाच रात्री प्रकाशझोतात आलेल्या रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. तिला चाहते रिंकू नाही तर, आर्ची नावानेच सर्वाधिक ओळखतात. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी आर्ची सध्या खासगी आयुष्यामुळे कमालीची चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर काही तासांपासून एक फोटो तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे रिंकू राजगुरू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीचे चर्चेत आली आहे.
रिंकू राजगुरू हिने इन्स्टाग्रामवर भाजपा खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिकांसोबत एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये दोघांनाही एकत्र पाहून उलट- सुलट चर्चा सुरु झाली आहे. रिंकू सध्या कोल्हापूरात आहे. तिने कोल्हापूरला गेल्यानंतर करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. तिने देवीचे दर्शन कृष्णराज महाडिक यांच्यासोबत घेतले आहे. कृष्णराज महाडिक युट्यूबर असून त्यांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिंकूचा आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर केलेल्या त्या फोटोला “आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले…” असं कॅप्शन देण्यात आलेले आहे.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये भलत्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “महाडीकांची तिसरी सुन”, “कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील आमदार”, “जोडी खूप छान दिसते”, “हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा”, “महाडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं”, “मला वाटलं ठरलं की काय”, “विचार करायला हरकत नाही”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. रिंकू आणि कृष्णराज यांना एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कृष्णराज यांच्या कार्यालयाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला फोटो पाहून चाहत्यांमध्ये भलत्याच चर्चांना उधाण आलं आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी (१० फेब्रुवारी) कोल्हापुरात ‘राजर्षी शाहू महोत्सवा’साठी गेली होती. त्यानंतर ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाला गेली होती. त्याचवेळी कृष्णराज महाडिक दर्शनासाठी मंदिरात आले होते. त्या भेटीदरम्यान त्यांनी फोटो काढला. तोच फोटो कृष्णा महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला.