‘पुष्पा 2: द रुल’ मधील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं आधीच चार्टबस्टर झाला आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 50 सर्वाधिक वाजल्या गेलेल्या तेलुगू गाण्याच्या यादीत याने पहिले स्थान पटकावले आहे आणि आता देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपीने चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रॅकच्या घोषणा करून एका व्हिडिओसह चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. हे गाणं ‘द कपल सॉन्ग’ आहे असं कळतंय. व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना या गाण्याची एक हलकी चाहूल देत आहे.
हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता गगनाला भिडली असून हे गाणे 29 मे रोजी रिलीज होणार आहे तरी चाहत्यांनी ते आधीच चार्टबस्टर म्हणून घोषित केले आहे.
‘पुष्पा 2: द रुल’ हा निःसंशयपणे या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे, पण चाहते त्याच्या संगीताची तितकीच वाट पाहत आहेत. ‘पुष्पा: द राइज’च्या संगीताने जगभरात धुमाकूळ घातला होता. डीएसपीने चित्रपटातील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला होता आणि ‘पुष्पा 2: द रुल’ च्या पहिल्या दोन गाण्यांवरील प्रतिक्रिया पाहता, डीएसपीचा हा अल्बम देखील प्रत्येक रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे. संगीतकाराच्या आणखी एका राष्ट्रीय पुरस्कारासाठी चाहत्यांनी आतापासूनच सुरुवात केली आहे.
[read_also content=”रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण https://www.navarashtra.com/movies/rapper-king-shubham-kolis-number-kari-song-poster-unveiled-in-grand-style-537317.html”]
गेल्या काही वर्षांमध्ये डीएसपी हे मोस्ट वॉन्टेड तसेच मागणी असलेल्या संगीतकारांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने केवळ दक्षिणेतील प्रेक्षक नाही तर बॉलीवूडच्या प्रेक्षकांनाही त्याच्या मनमोहक बीट्सवर खेळवून ठेवले आहे. आणि आता, देश ‘पुष्पा 2: द रुल’ मधील गाणं तो लवकरच लाँच करणार आहे. तसेच ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.