सैयाराचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अंदाज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक मोहित सुरी पुन्हा एकदा त्यांचा संगीतमय रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ घेऊन येत आहेत. ‘आशिकी २’ च्या जबरदस्त यशानंतर सर्वांच्या नजरा या चित्रपटावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे तरूणाईला या चित्रपटाचे ट्रेलर खूपच आवडले असल्याचे व्ह्यूजवरून कळून येत आहे आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या फ्रेश जोडीप्रमाणेच मोहित सुरी यांनीही ‘सैयारा’ चित्रपटात एक फ्रेश जोडी आणली आहे.
या चित्रपटाद्वारे अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत अनिता पद्डा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त एक दिवस उरला आहे. ‘सैयारा’ चित्रपटाने अहान पांडे पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवू शकेल का ते जाणून घेऊया?
सैयाराचे Advance Booking
मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक तो पाहण्यास उत्सुक आहेत. निर्मात्यांनी अॅडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘सैयारा’ने रिलीजपूर्वी अॅडव्हान्स बुकिंग करून ४९५६ शोसाठी १०,२६११ तिकिटे विकली आहेत. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने २.७२ कोटी रुपयांचे गगनचुंबी कलेक्शन आधीच केले आहे आणि रिलीज होण्याआधीच ब्लॉक सीट्ससह, ‘सैयारा’ने ४.५७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
सैयाराचा पहिल्या दिवसाचा अंदाज
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘सैय्यारा’ला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाचे कलेक्शन दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. प्री-सेलमध्ये अजून १२ तास शिल्लक आहेत आणि रिलीज होण्यापूर्वीच त्याने २.७२ कोटींची कमाई केली आहे. यामुळे, ‘सैय्यारा’ पहिल्या दिवशी १०-१२ कोटींपर्यंत कमाई करू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याशिवाय, १५-२० कोटींच्या जवळपासही अंदाज लावले जात आहेत.
अहान पांडे करेल का रेकॉर्ड
‘सैयारा’साठी ज्या प्रकारची क्रेझ दिसून येत आहे, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की अहान पांडे पदार्पणाच्या चित्रपटांमधील सर्व विक्रम मोडू शकतो. जर आपण हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’पासून सुरुवात केली तर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५१ लाख रुपयांचा व्यवसाय केला. ‘धडक’ने ८.७६ कोटी रुपये आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ने ७.५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटांना मागे टाकून ‘सैयारा’ पदार्पणाच्या रूपात एक नवीन विक्रम रचू शकतो अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे.
सैयाराचे ट्रेलर