Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ कोणतं रहस्य उलगडणार? ट्रेलरमुळे वाढली उत्सुकता

‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला साजिनी शिंदे (राधिका मदन) कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो.

  • By साधना
Updated On: Oct 13, 2023 | 06:26 PM
sajini shinde ka viral video

sajini shinde ka viral video

Follow Us
Follow Us:

प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे. कारण मॅडॉक फिल्म्सने ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ (Sajini Shinde Ka Viral Video) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे. ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला साजिनी शिंदे (राधिका मदन) कशी आणि का बेपत्ता झाली आणि तिच्या बेपत्ता होण्यास कोण जबाबदार आहे याचा अंदाज लावण्यास भाग पाडतो. या वर्षातील सर्वात मोठा थरारपट म्हणून ओळखला जाणारा, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख कलागुणांना वाव देताना दिसणार आहे. तसेच हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीचा उत्तम मिलाफ यात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात राधिका मदन, निम्रत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका तरुण भौतिकशास्त्र शिक्षिकेची आहे जी रहस्यमय परिस्थितीत गायब होते. एक अनुभवी आणि अत्यंत कुशल गुन्हे शाखेची अन्वेषक, बेला (निम्रत कौर) हरवलेल्या साजिनीला शोधण्यासाठी केस हाती घेते. बेला प्रयत्नांची पराकाष्टा करत असते. डोळ्यासमोर धुसर असं सर्व दिसत असतानाही ठोस असे तिच्या हाती काही लागत नाही आणि सत्य शोधण्यासाठी ती काळाशी झुंज देत असताना, अनपेक्षित वळणांची मालिका उलगडते.

मिखिल मुसळे यांनी दिग्दर्शित केलेला ट्रेलर प्रेक्षकांसाठी कथेला उत्तम प्रकारे सादर करतो, त्‍याचा खुलासा न करता खूप काही सांगून जातो. ते सांगतात की, “कथा एका सामाजिक थरारपटाच्या सेटअपमध्ये तयार करण्यात आली आहे आणि त्यात हिंदी आणि मराठी कलाकारांच्या प्रतिभावान समूहाचे उत्तम मिश्रण आहे. या सर्वांनी हे सुनिश्चित केले आहे की त्यांची उल्लेखनीय कामगिरी केंद्रस्थानी आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटाला खूप प्रेम मिळेल कारण त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले आहे.”

मॅडॉक फिल्म्सचे निर्माते दिनेश विजन म्हणाले, “मॅडॉकमध्ये आमचा कंटेंट वितरित करण्यावर विश्वास आहे आणि पुन्हा एकदा ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’सह आम्ही तेच केले आहे. हा एक सामाजिक थरारपट आहे जो तुम्हाला खिळवून ठेवतो आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना तो पाहताना आनंद मिळेल.”

मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी दिले आहेत. ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ 27 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sajini shinde ka viral video trailer nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 06:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Radhika Madan

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.