Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishal Dadlani: ३० वर्षांपासून विशाल ददलानी का ठेवतात टक्कल? ना आजार, ना फॅशन; गायकानेच सांगितलं कारण

Vishal Dadlani : गायक आणि संगीतकार विशाल ददलानी गेल्या तीन दशकांपासून टक्कल लूकमध्ये दिसत आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी तिरुपतीमध्ये मुंडन केल्यानंतर त्यांनी पुन्हा केस न वाढवण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या यामागची रंजक कहाणी.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2026 | 04:03 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Vishal Dadlani :लोकप्रिय बॉलिवूड गायक आणि संगीतकार विशाल ददलानी त्यांच्या दमदार आवाजासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. गेल्या तीन दशकांपासून ते टक्कल लूकमध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी हा लूक का स्वीकारला, यामागचं नेमकं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. तरुणपणी लांबसडक केस असलेल्या विशाल यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी डोक्याचे मुंडन करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी स्वतःच या लूकमागची रंजक कहाणी सांगितली आहे.

नुकतीच विशाल ददलानी यांनी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या यूट्यूब शोमध्ये हजेरी लावली. यावेळी ५३ वर्षीय विशाल यांनी आपल्या टक्कल लूकमागील कारणासोबतच आयुष्यातील काही खास गोष्टींचाही खुलासा केला.

वयाच्या २३ व्या वर्षी घेतला होता टक्कल ठेवण्याचा निर्णय

शोदरम्यान विशाल यांना त्यांच्या टक्कल लूकबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत त्यांचे केस लांब होते. यावेळी त्यांनी नेहा धुपियाला तरुणपणीचा स्वतःचा एक जुना फोटोही दाखवला.

विशाल यांनी सांगितले की, एकेकाळी ते अत्यंत धार्मिक होते. याच श्रद्धेपोटी वयाच्या २३ व्या वर्षी ते तिरुपतीला गेले होते. तिथे त्यांनी डोक्याचे मुंडन केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा कधीही केस वाढवणार नाही, असा स्वतःशीच निर्धार केला. गेल्या अनेक वर्षांपासून ते या निर्णयाचे पालन करत आहेत.

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?

धार्मिक श्रद्धेत बदल, आता स्वतःला म्हणतात नास्तिक

विशाल ददलानी यांनी सांगितलेल्या या किस्स्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या धार्मिक श्रद्धेमुळे त्यांनी केस काढले होते, त्या श्रद्धेत कालांतराने मोठा बदल झाला. धर्माबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला असून आज ते स्वतःला उघडपणे नास्तिक म्हणवतात.

२०१८ मध्ये ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर धर्माबद्दल आपले मत मांडताना त्यांनी लिहिले होते, “मी एक नास्तिक आहे, जो जन्माने हिंदू आहे आणि मी कोणत्या जातीचा आहे हे मला माहीतही नाही.”

विशाल ददलानी यांचा टक्कल लूक आज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास भाग बनला आहे. मात्र, या लूकमागे कोणताही आजार किंवा फॅशन नसून तरुणपणी घेतलेला एक वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांच्या या खुलाशातून समोर आले आहे.

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती

Web Title: Vishal dadlani bald look reason tirupati head shaving story ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • entertainment
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Vicky Kaushal Sleep Talking: ना स्क्रिप्ट, ना कॅमेरा… गाढ झोपेत अचानक सुरू व्हायचं या अभिनेत्याचा अभिनय! लहान भावाने केला खुलासा
1

Vicky Kaushal Sleep Talking: ना स्क्रिप्ट, ना कॅमेरा… गाढ झोपेत अचानक सुरू व्हायचं या अभिनेत्याचा अभिनय! लहान भावाने केला खुलासा

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?
2

Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती
3

Hanuman Ansh Success Party: ना दारू, ना मांसाहार! ‘हनुमान अंश’च्या सक्सेस पार्टीची चर्चा; कार्तिक आर्यनचीही उपस्थिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाच्या डीपफेक फोटोंनी उडवली खळबळ! आरोपीला दिल्लीतून अटक, पण न्यायालयाने का दिला दिलासा?
4

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाच्या डीपफेक फोटोंनी उडवली खळबळ! आरोपीला दिल्लीतून अटक, पण न्यायालयाने का दिला दिलासा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.