काल एकीकडे रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट अॅनिमल (Animal) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तर दुसरीकडे विकी कौशलनेही सॅम माणेकशॉच्या बायोपिक सॅम बहादूर (Sam Bahadur) प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटामंध्ये आता चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. अॅनिमलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून चांगली कमाई 60 कोटींची केली आहे. तर, विकी कौशलच्या सॅम बहादूरन पहिल्य दिवशी किती कमाई केली जाणून घ्या..
[read_also content=”रणबीर कपूरच्या अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई! https://www.navarashtra.com/movies/animal-box-office-collection-day-is-60-crore-nrps-485139.html”]
एकीकडे चित्रपटगृहांमध्ये अॅनिमलची चांगलीच गर्जना सुरू आहेत, तर दुसरीकडे सॅम बहादूर थोडा संथ दिसत आहेत. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूरने पहिल्या दिवशी केवळ 5.50 कोटींची ओपनिंग केली आहे. मात्र, अॅनिमलसारख्या बिग बजेट पॅन इंडियाच्या सिनेमासमोर सॅमने इतकं जमवलं आहे, जे चांगलं आहे.
रणबीरच्या अॅनिमलला मोठ्या ओपनिंगची अपेक्षा होती आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट किमान १०० कोटींची कमाई करेल, असा विश्वास ट्रेड तज्ज्ञांनी व्यक्त केला होता आणि हा विश्वास खरा ठरताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास 60 कोटींची कमाई केली आहे.
यापैकी हिंदीतील चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकंंदरीत’अॅनिमल’ची जगभरात 100 कोटींची ओपनिंग झाली आहे.