Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिगरबाज समृद्धी… ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णाने ४० फूट खोल विहिरीत मारली उडी

स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 09, 2025 | 05:26 PM
जिगरबाज समृद्धी... 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत कृष्णाने ४० फूट खोल विहिरीत मारली उडी

जिगरबाज समृद्धी... 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेत कृष्णाने ४० फूट खोल विहिरीत मारली उडी

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय. या मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने या विहिरीत उडी मारली. मालिकेतला हा अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने जिद्दीने पूर्ण केला.

स्नेहलता वसईकरचा जबरदस्त कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत साकारणार दमदार भूमिका

मालिकेच्या शुटिंग दरम्यानचा अनुभव सांगताना समृद्धी म्हणाली की, “मला पोहायला येतं मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापुरातल्या एका शेतातल्या ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न घेता हा सीन करण्याचा ठरवलं. ”

 

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

“मनाची तयारी केली आणि मी विहिरीत उडी घेतली. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे विहिरीत माझ्यासोबत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडतं. या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे असंच म्हणेन. तेव्हा नक्की पाहा हळद रुसली कुंकू हसलं दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.” असं अभिनेत्री अनुभव सांगताना म्हणाली.

Web Title: Samruddhi kelkar jumped into a 40 foot deep well in halad rusli kunku hasla serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • marathi actress
  • samruddhi kelkar
  • Television Actress

संबंधित बातम्या

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…
1

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर
2

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 
3

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…
4

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.