बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरामध्ये कलर्स मराठी (Colors Marathi) आणि एअरटेलद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेमधून त्रिशूल मराठेला (Trishul Marathe) बिग बॉस मराठीचा सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळाली. महेश मांजरेकर यांनी त्याचे कौतुक देखील केले. घरामध्ये त्रिशूलचे सगळ्या सदस्यांसोबत चांगले नाते आहे. काही दिवसांमध्येच समृद्धी आणि त्रिशूलची चांगली मैत्री झाली हे बघायला मिळत आहे आणि त्याच विषयी आज ते चर्चा करताना दिसणार आहेत.
[read_also content=”रीलस्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचे निलंबन अखेर मागे https://www.navarashtra.com/maharashtra/reelstar-lady-conductor-mangal-giris-suspension-finally-lifted-nrgm-336030.html”]
समृद्धी त्रिशूलवर जरा नाराज आहे आणि त्याच्याशी बोलताना दिसणार आहे की, “या घरात तुला आता दुसरा बीएफएफ (BFF) मिळाला आहे, मित्र खूप होऊ शकतात पण बेस्ट फ्रेंड एकच असतो.” त्यावर त्रिशुलचं म्हणणं आहे, “पण तू तर म्हणाली अक्षय आहे ना तुझा बीएफएफ .” त्यावर समृद्धी म्हणाली, “नाही … कोण बोललं तुला ? काल मी थोडी नाराज होती तुझ्या वागण्यामुळे म्हणून… त्रिशूल आता भांडेन मी तुझ्याशी”. मग भांडताना हसू नकोस… यु आर माय बीएफएफ विषय संपला”.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे. अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, “त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते की आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत… मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. आणि ही तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे… ‘मी कट्टर आहे’ आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही बायस्ड खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन”.
समृद्धी आणि त्रिशूलचं लुटुपुटुच भांडण तसेच अपूर्वा, समृद्धी आणि रुचिरामध्ये झालेली चर्चा आज रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.