(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिषेक नामा दिग्दर्शित पौराणिक अॅक्शन चित्रपट “नागबंधम” चा बहुप्रतिक्षित टीझर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. या पौराणिक अॅक्शन चित्रपटात अभिनेता विराट कर्ण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुपरस्टार महेश बाबूने रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी अतिशय भव्य प्रमाणात बनवलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज केला.‘नागबंधम’च्या टीझरने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच या टीझरने सर्व प्लॅटफॉर्मवर 20 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवत चित्रपटाबद्दलची उत्सुकता किती प्रचंड आहे, हे स्पष्ट केले. आणि आता या चित्रपटाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
हा मायथॉलॉजिकल-फॅन्टसी ड्रामा IMDb च्या ‘2026 मोस्ट एंटिसिपेटेड फिल्म्स’ यादीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे ‘नागबंधम’ने ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर: द रिवेंज’सारख्या मोठ्या चित्रपटांसोबत खांद्याला खांदा लावत आपली मजबूत उपस्थिती नोंदवली आहे.
“नागबंधम” चे निर्माते एक मोठा टप्पा साजरा करत आहेत कारण महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरला अवघ्या २४ तासांत सर्व प्लॅटफॉर्मवर २० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टीमने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये देवाच्या आशीर्वादाबद्दल आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
IMDb ची ही यादी पेज व्ह्यूज आणि युजर एंगेजमेंटच्या आधारे तयार केली जाते. त्यामुळे सिनेप्रेमींमध्ये ‘नागबंधम’बद्दल किती मोठा क्रेझ निर्माण झाला आहे, हे यातून स्पष्ट होते. पौराणिक प्रतीकांशी जोडलेले या चित्रपटाचे वेधक शीर्षक आधीपासूनच त्याच्या भव्य कथा आणि स्केलबद्दल चर्चा रंगवत आहे.
टीझरमध्ये दाखवलेली प्राचीन भारतीय परंपरांवर आधारित आणि ‘तांत्रिक खजिन्याला बांधून ठेवण्याच्या’ रहस्यमय संकल्पनेवर उभी असलेली भव्य दृश्यरचना विशेष चर्चेत आहे. चित्रपटाचा ग्रँड स्केल, दमदार बॅकग्राउंड स्कोर आणि भव्य सिनेमॅटिक कॅनव्हास यांची प्रेक्षकांकडून जोरदार प्रशंसा होत आहे. साहसी कथानक आणि भव्य मांडणीमुळे ‘नागबंधम’ 2026 मधील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरणार, अशी चर्चा आहे.‘नागबंधम’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अभिषेक नामा यांनी केले आहे. किशोर अन्नापुरेड्डी आणि निशिता नागिरेड्डी निर्मित हा चित्रपट 2026 च्या उन्हाळ्यात पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे.






