sana shinde in maharashtra shahir
केदार शिंदे (Kedar Shinde) हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. शाहीर साबळे हे केदार शिंदेंचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मनोरंजन क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) असं या चित्रपटाचं नाव आहे. अंकुश चौधरी यात शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे.
[read_also content=”आर्थिक घोटाळा प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून चौकशी https://www.navarashtra.com/movies/inquiry-of-nora-fatehi-by-delhi-police-in-money-laundering-case-nrsr-321994.html”]
नुकतीच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातील आणखीन एका व्यक्तिरेखेबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्तिरेखा म्हणजे ‘भानुमती कृष्णराव साबळे’ म्हणजे शाहिरांची ‘पत्नी’. शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे ‘सना शिंदे’. दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या.
पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की, “आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं….सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती. शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!’पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!!महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३”.
दिग्दर्शक केदार शिंदे स्वतः एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, गायक आहेत. आता त्यांची मुलगी देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यादेखील निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आहेत. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत अजय- अतुल यांनी दिलं आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.