"सगळ्या आघाड्यांवर खरं कसं उतरायचं बाप माणसांना बरोब्बर कळतं…"; संकर्षण कऱ्हाडेची वडिलांसाठी खास पोस्ट
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या कामाची कायमच चर्चा होते. तो एक प्रसिद्ध अभिनेता असून तो एक कवी, सुत्रसंचालक आणि लेखक आहे. अशा बहुआयामी अभिनेत्याच्या कामाची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते. नाटक, मालिका आणि टिव्ही शोच्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि कलागुणांच्या जोरावर संकर्षण महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाला. अभिनयात अग्रेसर असलेला संकर्षण सोशल मीडियावरही सक्रिय असतो.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या खासगी आयुष्यातील एक गोष्ट शेअर केलीये. त्याने आपल्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
” ‘जब वी मेट २’ आला तर गीतसाठी तू करेक्ट…”, रुपाली भोसले नेमकं कोणाला म्हणाली ?
संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट
आमचे बाबा परवा मुंबईहून तडकाफडकी परभणीला निघाले … कारण काय … तर, शेतातल्या गड्याचा फोन आला की, आपल्या शेतातला बैल “रामा” २ दिवस झाले जागचा उठत नाहीये , खात नाहीये …
मी म्हणलं बाबा गडी आहे की… तुम्ही जायची काय गरज…?
मला म्हणाले ; उद्या तुला बरं वाटलं नाही तर अस्साच परभणीहून पळत येईन ना … मी म्हणलं ; “मी काय बैलासारखाच का …???”
बाबा म्हणाले नाही , पण “बैल पोरासारखा सांभाळावा…”
निघाले ते निेघालेच…
२ दिवस त्याच्यासोबत वेळ घालवला, त्याला खूप माया केली , त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं … देवाचा धावा करुन त्याला तीर्थ म्हणून पाणी पाजलं… आणि आता रामा कामाला लागला …
काय म्हणाल तुम्ही ह्याला ….??? म्हणा काही … पण , सग्ग्ग्गळ्या आघाड्यांवर सतत कसं १०० टक्के खरं उतरायचं हे बाप माणसांना बरोब्बर कळतं …
अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
शेअर केलेल्या पोस्टमध्ये संकर्षणने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्या पोस्टमध्ये, अभिनेत्याचे वडिल रामा बैलाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. संकर्षणची ही इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टखाली कमेंट्सने लक्ष वेधलेय. “किती गोड”, “असे बाबा सगळ्यांना मिळो”, “हे खूपच भारी आहे”, “केवढी ती माणुसकी” अशा अनेक कमेंट्सद्वारे संकर्षणच्या बाबांचे कौतुक केलं आहे. तसंच त्यांचा साधेपणाही संकर्षणच्या चाहत्यांना भावला असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.