Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’चा हटके टीझर प्रदर्शित; चित्रपट केव्हा होणार रिलीज

लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर रिलीज झाला. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 09, 2025 | 08:05 PM
लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’चा हटके टीझर प्रदर्शित; चित्रपट केव्हा होणार रिलीज

लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’चा हटके टीझर प्रदर्शित; चित्रपट केव्हा होणार रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ ऑक्टोबर दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत..

गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार ‘नामस्मरणाचे’ महात्म्य

‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या सामाजिक विषयावर भाष्य करत, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. तरुण आणि वयस्क अशा दोन्ही प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली. त्यामुळे आता ‘प्रेमाची गोष्ट २’बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट’ ने जसा संवेदनशील विषय मांडत मनोरंजन दिलं, तसंच काही तरी अधिक प्रभावी’प्रेमाची गोष्ट २’ मधून पाहायला मिळेल, अशी आशा आहे.

सती प्रथेवर आधारित ‘सत्यभामा’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज; सिनेमा केव्हा रिलीज होणार ?

टीझरमध्ये ललित प्रभाकरसह अभिनेता स्वप्नील जोशी व भाऊ कदमही दिसत आहेत. आबुराव आणि बाबुराव अशी यांच्या पात्राची नावे असून त्यांनी चित्रपटाला अजूनच रंगत आणली आहे. टीझरमध्ये ललित घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आलेला दिसत आहे. प्रेमात त्याचा निर्णय चुकल्यामुळे तो देवाला दोष देत असल्याने प्रत्यक्ष देवानेच ‘होऊ दे तुझ्या मनासारखं’ म्हणत त्याला त्याच्या नशीबातलं प्रेम बदलण्याचा एक चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संधीने ललितचे नशीब खुलेल का? हे पाहाणे नक्कीच रंजक ठरेल. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरसह अभिनेत्री ऋचा वैद्य व रिधिमा पंडित यांचा दमदार अभिनय पाहायला मिळेल.

 

प्रिया बापट- उमेश कामत तब्बल १२ वर्षांनी चित्रपटात एकत्र झळकणार; सोबतीला असणार ‘हे’ कलाकार, पोस्टर रिलीज

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “ आजच्या पिढीच्या प्रेमाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनला साजेशी अशी अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी याआधीही सुपरहिट प्रेमकथा असलेले चित्रपट केले आणि आता अशीच एक सुपरहिट व हटके प्रेमकथा आम्ही सादर करणार आहोत.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ ही एक अशी फ्रेश प्रेमकहाणी आहे, जी व्हीएफएक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होतो. लवकरच प्रेक्षकांना ही प्रेमाची गोष्ट पाहायला मिळेल.”

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.

Web Title: Satish rajwade directed premachi goshta 2 marathi movie teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली?  दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!
1

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत
2

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटातून उलगडणार गोड प्रेमाची गोष्ट, श्रमेश बेटकर दिसणार खास भूमिकेत

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
3

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
4

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.