Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहिणींचा संघर्ष आणि महिला सशक्तीकरणाची झलक; ‘लाडकी बहीण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 07, 2026 | 05:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

काही चित्रपट त्यांच्या घोषणा झाल्यापासूनच रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करतात. समाजातील घटनांवर थेट भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सध्या सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’च्या सामाजिक परिणामांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ ही संकल्पना आता रुपेरी पडद्यावरही दिसणार आहे.

चित्रपटाची टॅगलाईन “१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी” आहे. हा सामाजिक आणि विनोदी अंगाने सादर केलेला चित्रपट १७ एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे.

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत, तर कार्यकारी निर्माता आहेत बाबासाहेब पाटील. लेखक प्रताप गंगावणे या चित्रपटाचे मार्गदर्शन करत असून, शेखर मते, पंकज चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि लहू साळुंखे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटात एका सरकारी योजनेमुळे घरातील सामान्य गृहिणींच्या जीवनावर होणारा प्रभाव आणि महिलांचा संघटनाद्वारे उत्कर्ष साधण्याचा प्रवास साकारलेला आहे.

या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटते. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत. एखाादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…’ या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘लाडकी बहीण’मध्ये आहे.

सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल असा ठाम विश्वास दिग्दर्शक शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi 6 : अनपेक्षित वळण! सागरचा घरातील प्रवास संपला? रुचिताला आवरले नाही आंसू

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचे काम ‘लाडकी बहीण’ चित्रपटात करण्यात आले आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळण रसिकांवर मोहिनी घालणार आहे. चिनू चेतन यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गायक-संगीतकार उमेश गवळी. तसेच आनंद शिंदे व गायत्री शेलार यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.

Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

Web Title: Glimpses of housewife struggles and women empowerment ladki bahin movie coming soon to audiences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Gautami patil
  • Ladki Bahin Yojana
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.