पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती खालावली आहे.
विक्रम गोखले यांनी आजवर रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर दमदार भूमिका केल्या आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलंय. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटातही विक्रम गोखले यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.
[read_also content=”‘रौंदळ’ चित्रपटातील रोमँटीक गाणं ‘मन बहरलं’ प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/photos/man-baharala-song-from-raundal-movie-is-released-nrsr-347639.html”]
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.
गेल्या काही दिवसांपासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देत आहेत.