नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अजूनही परवानग्या न मिळाल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली असून, छगन भुजबळ यांच्यासोबत याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीबाबतही पदाधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले होते. परवानग्या न मिळणे, जाहिरात कर माफ न होणे, रस्त्यांवरील खड्डे यांसह अनेक अडचणी मंडळांसमोर उभ्या आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळावी ही प्रमुख मागणी असून, “परवानगी मिळो वा न मिळो आम्ही गणेशोत्सव साजरा करणारच” अशी ठाम भूमिका मंडळांनी स्पष्ट केली आहे.