(फोटो सौजन्य: X)
प्राणी, पक्ष्यांचे आयुष्य हे मानवांच्या आयुष्याहुन बरेच वेगळे असते. इथे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो आणि पोटाची भूक राखायची तर आपल्याहून कमकुवत जीवांचा बळी घ्यावा लागतो. काही बलवान शिकाऱ्यांची नावे घेऊ पाहिली तर यात सिंह, वाघ यांची नावे समोर येतात पण अवकाशातली शिकार म्हटली की यात प्रामुख्याने जो समोर येतो तो म्हणजे गरुड पक्षी. आपली तीक्ष्ण नजर, मजबूत पकड आणि वेगाच्या जोरावर तो अनेक प्राण्यांची तसेच पक्ष्यांची शिकार करतो. अशातच आता गरुडाच्या एका चित्तथरारक शिकारीचा एक अनोखा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यात त्याने चक्क एका हरणाची शिकार केल्याचे दृश्य दिसून आले आहे. भल्यामोठ्या हरणाला अवकाशात घेऊन तो त्याची शिकार करतो अन् हे दृश्य सर्वांच्याच अंगावर काटा आणत. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एका गरुडाने हरणाच्या पिल्लाची शिकार केल्याचे दिसून आले आहे. गरुडाला मुळातच अवकाशाच्या राक्षसाची उपमा देण्यात आली आहे. त्याची नजर एकदा का कोणत्या प्राण्यावर पडली तर त्याचे जिवंत परतणे कठीण असते. व्हिडिओत दिसते की, एक हरीण मोकळ्या मैदानात विहार करत असते आणि याचवेळी एका गरुडाची त्याच्यावर नजर पडते. गरुड हरणाला पाहताच त्याच्या दिशेने वेगाने उडत जातो आणि जवळ पोहचताच त्याला आपल्या चोचीत पकडून हवेत उडून जातो. हवेत उडणारे हरणाचे ते शरीर आणि गरुडाची जबरदस्त पकड अनेकांचा थरकाप उडवते. इतक्या मोठ्या प्राण्याची शिकार एका गरुडाकडून होणे अनेकांना थक्क करणारे होते ज्यामुळे लोक ते पाहून आश्चर्यचकित होतात आणि वेगाने हे दृश्य शेअर करू लागतात.
The terrifying beauty of wildlife.
A Thread 🧵
1. A huge eagle carrying a “Big deer “.. 😯 pic.twitter.com/1L17jRihkL
— Crazy Moments (@Crazymoments01) August 17, 2025
दरम्यान गरुडाच्या शिकारीचा हा व्हिडिओ @Crazymoments01 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतके वजन घेऊन त्याला कसे उडता आले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे गरुड हरणाचीही शिकार करू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोणताही प्रभावी मार्ग नाही. हा खरा व्हिडिओ नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.