गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर Google चा मोठा धमाका! Google Pixel 10 सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग...
Google चा ग्रँड ईव्हेंट बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित Pixel 10 सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Pixel 10, Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL हे मॉडेल्स लाँच केले आहेत. स्मार्टफोन्स इन-हाउस Tensor G5 चिपसेट आणि Titan M2 सिक्योरिटी चिप्सने सुसज्ज आहे. यामध्ये इनबिल्ट Qi2 चार्जिंग मैग्नेट्स देण्यात आले आहे. Pixel 10 आणि Pro मॉडल्समध्ये 5x ऑप्टिकल झूम सपोर्टवाला टेलीफोटो कॅमेरा आहे.
Google Pixel 10 भारतात 256GB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट इंडिगो, फ्रॉस्ट, लेमनग्रास आणि ओब्सीडियन शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL मध्ये देखील 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. Pixel 10 Pro ची किंमत 1,09,999 रुपये आणि Pixel 10 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स जेड, मूनस्टोन आणि ओब्सीडियन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. Pixel 10 Pro हा Porcelain व्हेरिअंटमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे. Google Pixel 10 सीरीज स्मार्टफोन्स देशभरात फ्लिपकार्टद्वारे खरेदिसाठी उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
Google Pixel 10 मध्ये 6.3-इंच फुल-HD+ (1,080×2,424 पिक्सेल) OLED Super Actua डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन आहे. रिअर पॅनेलवर देखील हे प्रोटेक्टिव ग्लास आहे. हँडसेट 3nm Tensor G5 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्योरिटी चिपने सुसज्ज आहे, ज्याला 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हे Android 16 सह येते आणि 7 वर्षांपर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट्स रिसिव्ह करणार आहे. फोन गुगल जेमिनीला देखील सपोर्ट करते आणि Material You Expressive डिझाईन सिस्टम ऑफर करते.
फोटोग्राफीसाठी Google Pixel 10 मध्ये 48-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर, 5x झूम सपोर्टसह 10.8-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा आणि 13-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर बॅकवर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 10.5-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग सेंसर आहे. हे अनेक AI-बॅक्ड इमेजिंग टूल्सला सपोर्ट करतो, ज्यामध्ये कॅमेरा कोच देखील समाविष्ट आहे.
Google Pixel 10 मध्ये 4,970mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हे डिव्हाईस 15W पर्यंत Qi2 वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. हँडसेटमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी वेपर कूलिंग चेंबर आहे. यामध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंग आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. हे eSIM, 5G, 4G, GPS, GNSS, Google Cast, Bluetooth 6, Wi-Fi, NFC आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करते.
Google Pixel 10 Pro मध्ये 6.3-इंच Super Actua डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1,280×2,856 पिक्सेल्सचे रेजोल्यूशन आहे. तर Pixel 10 Pro XL मध्ये मोठी 6.8-इंच स्क्रीन आहे, ज्यामध्ये 1,344×2,992 पिक्सेल्सचे रेजोल्यूशन आहे. दोन्ही फोनमध्ये LTPO पॅनल्स आहेत, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे आणि हे 3,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. ड्यूरेबिलिटीसाठी, याला फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला Corning Gorilla Glass Victus 2 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. Pro मॉडेल्स देखील Tensor G5 चिप्सने सुसज्ज आहेत.
Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL मध्ये स्टँडर्ड मॉडलसारखेच ऑपरेटिंग सिस्टम, कनेक्टिविटी, चार्जिंग, कूलिंग, बिल्ड आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. Pro वर्जन 50-मेगापिक्सल मेन रियर सेंसर, 48-मेगापिक्सल 5x टेलीफोटो कॅमेरा आणि 48-मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा ऑफर करतो. यामध्ये 42-मेगापिक्सल सेल्फी स्नॅपर देखील आहे. Pro मॉडेल 4,870mAh बॅटरी आणि Pro XL मॉडेल 5,200mAh बॅटरी ऑफर करते.